⚡ ब्रेकिंग News

राज ठाकरेंना लातूरकरांचे खास वर्धापनदिन गिफ्ट; रेणापूर पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध



  राज ठाकरेंना लातूरकरांचे खास वर्धापनदिन गिफ्ट; रेणापूर पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

 पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यात पंचायत समितीवर मनसेचा झेंडा; मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड

लातूर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रायगडावर पक्षाचा २० वा वर्धापन दिन साजरा केला असतानाच, लातूर जिल्ह्यातून मनसेला मोठी गुडन्यूज मिळाली आहे. रेणापूर पंचायत समितीवर मनसे-भाजप युतीची सत्ता स्थापन झाली असून, पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यात पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. राज ठाकरे यांच्या वर्धापनदिनानिमित्त लातूरकरांनी हे खास गिफ्ट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी काँग्रेसने तीन, भाजपने तीन तर मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राजकीय लवचिकता दाखवत मनसेसोबत युती केली. सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर भाजपचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी निवड झाली.

या निवडणुकीत लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना भाजपसोबत आणण्यात त्यांना यश आले. रेणापूरमधील या सत्तास्थापनेमुळे लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार धीरज देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांना राजकीय शह देण्यात आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध करत राज्यातील एकमेव महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. मात्र, ग्रामीण भागात मनसे-भाजप युतीने काँग्रेसला पर्याय देत राजकीय समीकरणे बदलली आहेत. मनसेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही राजकीय कामगिरी पक्षासाठी मोठे यश मानली जात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...