⚡ ब्रेकिंग News

संजय राऊत यांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, "तुम्ही फक्त भजन करताय, लोक हवालदिल झालेत"


  संजय राऊत यांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, "तुम्ही फक्त भजन करताय, लोक हवालदिल झालेत"

गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची सरकारवर धारदार टीका

पंतप्रधान मोदींवर 'गुलामीचा करार' केल्याचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री फडणवीस यांना खोटं बोलू नका म्हणत आव्हान

मुंबई: इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या गॅस व इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते. माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते, त्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केलाय." त्यांनी ही टीका करताना भारत-अमेरिका संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना राऊत पुढे म्हणाले, "तुम्ही फक्त मोदींचं भजन करताय, काही नाही.. काही नाही... काही नाही... लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर, लोक हवालदिल झालेत." त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना विचारले की, "एक महिना पुरेल एवढं इंधन आहे, असं खोटं का सांगत आहात?"

राऊत यांनी राज्यातील गंभीर परिस्थितीची आकडेवारी देताना सांगितले की, मुंबईसारख्या महानगरात ४० टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडला आहे, कामगार गावाकडे परतत आहेत आणि अनेक तीर्थक्षेत्रात प्रसादाची कपात करण्यात आली आहे. "फक्त मोदींच्या नावाने भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही. एलपीजी गॅसच्या रांगा थांबणार नाहीत," असे ते म्हणाले.

पुढील दोन महिन्यांसाठी गुजरातला प्राधान्य दिल्याचा आरोप करताना राऊत म्हणाले, "देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण, मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री आहेत." त्यांनी मागणी केली की, गॅस टंचाईवर सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी आणि दोन्ही विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक करावी.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...