⚡ ब्रेकिंग News

वानखेडेच्या मैदानावर इंग्रजांचा घमंड चक्काचूर! टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, फायनलमध्ये न्यूझीलंडशी लढत


संजू सॅमसनची तुफानी 89, शिवम दुबेची झंझावाती 43; जेकब बेथेलच्या शतकालाही व्यर्थ ठरवत भारताचा 7 धावांनी विजय, अहमदाबादमध्ये होणार कांटेकी अंतिम सामना

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य इंग्लंडचा 7 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 253 धावांचा डोंगर उभा केला, तर इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 बाद 246 धावाच करू शकला. आता 2026 टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

संजू नावाचं वादळ, इंग्रजांची दाणादाण

सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला सुरुवातीला धक्का बसला आणि अभिषेक शर्मा 9 धावांवर बाद झाला. मात्र, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी डाव सावरत संघाला शतकापार नेले. ईशानने 18 चेंडूत 39 धावांची आक्रमक खेळी केली. संजू सॅमसनने मात्र वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 42 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर 89 धावा ठोकल्या.

संजू बाद झाल्यानंतर शिवम दुबेने तुफानी फलंदाजी करत 25 चेंडूत 43 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि 11 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकांत तिलक वर्माने 7 चेंडूत 3 षटकारांसह 21 धावांची झंझावाती खेळी केली, तर हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 27 धावा करत संघाला 253 पर्यंत पोहोचवले.

बेथेलचा एकट्याचा लढा अपुरा

254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. हार्दिक पांड्याने फिल सॉल्टला 5 धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. हॅरी ब्रूक 7 धावांवर बुमराहचा बळी ठरला. जॉस बटलर 25 धावांवर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. टॉम बॅन्टनने 17 धावा केल्या, पण तो अक्षर पटेलचा बळी ठरला.

मात्र, जेकब बेथेलने एका बाजूने संघाचा लढा कायम ठेवला. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक आणि 45 चेंडूत शतक झळकावले. त्याने शेवटपर्यंत झुंज दिली, पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने इंग्लंडचा संघ 246 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अखेर भारताने हा रोमांचक सामना 7 धावांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...