⚡ ब्रेकिंग News

'बायको पाहिजे' म्हणत मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा हा तरुण कोण? धनराज दांगटचा VIDEO व्हायरल


'बायको पाहिजे' म्हणत मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा हा तरुण कोण? धनराज दांगटचा VIDEO व्हायरल

 उन्हातान्हात लोकलमध्ये, रस्त्यावर पोस्टर घेऊन फिरतोय; नेटकऱ्यांना पडलेला प्रश्न - कोण आहे हा तरुण आणि का भटकतोय बायकोसाठी?

 सध्या मुंबईच्या रस्त्यांवर एक तरुण आपल्या वेगळ्या अंदाजासाठी चर्चेत आला आहे. 'बायको पाहिजे' असे लिहिलेले पोस्टर हातात घेऊन उन्हातान्हात रस्त्यांवर आणि लोकलमध्ये फिरणाऱ्या या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

धनराज धोंडीराज दांगट असे या तरुणाचे नाव असून, तो नेमका कोण आहे आणि बायको शोधण्यासाठी तो एवढा का वणवण भटकतोय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अनेकांनी त्याच्याशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला आहे.

दरम्यान, 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत हा तरुण प्रवेश करणार असून, त्याची ओळख पुढच्या भागात समोर येईल, अशी माहिती समोर येत आहे. मालिकेतील रम्या या पात्राला हा तरुण भेटतो आणि तिला 'तुम्ही सिंगल आहात का?' असा प्रश्न विचारतो. त्यावर रम्याने लहानपणीच आपले लग्न झाल्याचे सांगितल्यानंतर तो तेथून निघून जातो.

या छोट्याशा प्रसंगानंतर प्रेक्षकांमध्ये या रहस्यमय तरुणाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमके कोण आहेत धनराज दांगट आणि बायकोच्या शोधात ते भटकण्यामागचं कारण काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...