⚡ ब्रेकिंग News

इराण-इस्त्रायल युद्धाचा पुण्यात फटका; व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद



इराण-इस्त्रायल युद्धाचा पुण्यात फटका; व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद

हॉटेल्स आणि उद्योगांवर संकट; घरगुती वापरासाठी मात्र पुरवठा सुरू राहणार

पुणे :- इराण आणि इस्रायल-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट भारतात जाणवू लागला आहे. या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, पुण्यातील व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ थांबविण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी लागणारा गॅस योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देण्यावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. या प्लांटकडून सर्व डीलर्सना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी व्यावसायिक सिलेंडर्ससाठी गाड्या प्लांटमध्ये पाठवू नयेत.

व्यावसायिक वापराचे सिलेंडर हे ५ किलो, १९ किलो, ३५ किलो, ४२७ किलो अशा वेगवेगळ्या क्षमतेत उपलब्ध असतात. याचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच विविध उद्योगांमध्ये (जसे की धातू वितळवणे, पावडर कोटिंग) केला जातो. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक सिलेंडरवर अनुदान नाही:

व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर सरकारकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. त्यामुळे हे सिलेंडर घरगुती सिलेंडरच्या तुलनेत अधिक महाग असतात. सध्या असलेला मर्यादित साठा संपल्यानंतर नवीन ऑर्डरच घेतल्या जाणार नसल्याने, पुढील काळात व्यावसायिक क्षेत्रावर युद्धाचा हा फटका अधिक तीव्रतेने जाणवू शकतो. पुणे जिल्ह्यातील हे दोन्ही प्लांट हे या भागातील गॅस पुरवठ्याचे मुख्य केंद्र आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...