बिग बॉसमधून बाहेर पडताच प्राजक्ता शुक्रेची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'घरातील कर्णकर्कश्य आवाजात माझा आवाज शांतता निर्माण करत होता...'
'तुमचं प्रेम कायम सोबत राहील', गायिकेने व्यक्त केल्या भावना; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वातून आणखी एका स्पर्धकाचा निरोप झाला आहे. गायिका प्राजक्ता शुक्रे या काल झालेल्या एलिमिनेशनमध्ये बाद ठरल्या. प्रेक्षकांकडून कमी मते मिळाल्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. मध्यंतरी तिची आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर करण सोनावणेच्या मैत्रीची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, आता तिचा हा प्रवास संपुष्टात आला आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती लिहिते, "गायक म्हणून सुरू झालेला प्रवास, आज तुमच्या प्रेमामुळे इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. बिग बॉस (मराठी)च्या घरात जाण्याचे अनेक निकष असतात, पण त्यातला एक कॉमन निकष म्हणजे मनोरंजन. आजवर मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करत आले आहे."
पुढे ती म्हणते, "घरातल्या कर्णकर्कश्य आवाजामध्ये माझा एक आवाज काही काळासाठी शांतता निर्माण करत होता. या गोष्टीचा मला आनंद आहे. बाकी आपली भेट होतच राहील, पण भेटीचं माध्यम वेगळं असेल... सर्वांचे खूप खूप आभार."
प्राजक्ताने या पोस्टला एक लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे. ती म्हणते, "बिग बॉसच्या घरात दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचे खूप आभार. तुमचा प्रत्येक व्होट, मेसेज आणि प्रत्येक शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बिग बॉसच्या घरातील प्रवास जरी इथे थांबत असला, तरी तुमचं प्रेम कायम सोबत राहील. आपण भेट राहूया..."
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या खेळाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.