टी-20 विश्वचषक: सामनावीर संजू सॅमसनच्या 97 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताची सेमीफायनलमध्ये धडक; ५ मार्चला मुंबईत गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध महासंग्राम.
क्रांती न्यूज बातमी:
टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत यजमान वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने जेसन होल्डर (नाबाद ३७) आणि रोव्हमन पॉवेल (नाबाद ३४) यांच्या खेळीच्या जोरावर भारतासमोर १९६ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.
डावाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि ईशान किशन लवकर बाद झाले. मात्र, संजू सॅमसनने एकाकी झुंज देत अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव (१८) आणि तिलक वर्मा (२७) यांनीही महत्त्वाच्या खेळी केल्या. शेवटच्या षटकांत हार्दिक पंड्या बाद झाल्याने सामना रंगतदार झाला, पण संजू सॅमसनने (९७ धावा) किल्ला लढवत भारताला १९.२ षटकांतच विजय मिळवून दिला. संजूच्या या तुफानी खेळीमुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग सुकर झाला.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.