लाडकी बहीण योजना : जानेवारी हप्त्यासाठी निधी हस्तांतरित; शासन निर्णय जारी, १५०० रुपये लवकरच खात्यात
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी आहे. जानेवारी २०२६ च्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे १५०० रुपये वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने निधीचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) १८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे.
निधी वर्ग करण्यात आला
सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला ९८.४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी देण्यात आला आहे. यापूर्वीही सामाजिक न्याय विभागाकडून योजनेच्या हप्त्यांसाठी निधीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, ही सातत्यपूर्ण प्रक्रियाचा भाग आहे.
कधी मिळेल जानेवारीचा हप्ता?
आता महिला व बालविकास विभाग पुढील प्रक्रिया पार पाडून ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करेल. मागील हप्त्यांच्या वितरणाचा विचार करता, ही रक्कम येत्या काही दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२५ चा हप्ता डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीला देण्यात आला होता, तर डिसेंबरचा हप्ता १४ जानेवारी २०२६ रोजी वर्ग करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, जानेवारीचा हप्ताही लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.
योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मदत म्हणून दिले जातात. मात्र, ज्या लाभार्थी महिला पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात, त्यांना या योजनेतून दरमहा ५०० रुपये अतिरिक्त स्वरूपात दिले जातात.
लाभार्थी संख्या आणि ई-केवायसी अपडेट
दरम्यान, योजनेतील सक्रिय लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. जुलै २०२४ मध्ये योजना सुरू झाली तेव्हा तब्बल २ कोटी ४६ लाख महिलांनी अर्ज केले होते. मात्र, आतापर्यंत केवळ १ कोटी ९० लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. म्हणजेच ५५ लाखांहून अधिक महिलांनी आपले ई-केवायसी अद्याप केलेले नाही. परिणामी, डिसेंबर महिन्याचा हप्ता केवळ १ कोटी ६० लाख महिलांनाच देण्यात आला.
अशा महिलांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी किंवा त्यातील दुरुस्त्या करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे ई-केवायसी झाले नाही, त्यांनी वेळेत ते पूर्ण करावे, अन्यथा योजनेचा लाभ मिळणे बंद होऊ शकते.
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.