⚡ ब्रेकिंग News

बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण: पोलिसांची मोठी कारवाई; तीन ठिकाणी छापे, आठ लाखांचा औषधसाठा जप्त

 बदलापूर स्त्री बीज  विक्री प्रकरण: पोलिसांची मोठी कारवाई; तीन ठिकाणी छापे, आठ लाखांचा औषधसाठा जप्त

 प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याची शक्यता; आणखी मोठी आयव्हीएफ केंद्रे चौकशीच्या रडारवर

ठाणे/बदलापूर :- बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या महिला स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर या तीन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी बेकायदेशीरपणे घरांमध्ये सुरू असलेल्या आयव्हीएफ (IVF) केंद्रातील इंजेक्शन्स आणि औषधांचा साठा जप्त केला आहे. हा साठा अंदाजे आठ लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केवळ बदलापूरपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे ठाणे जिल्ह्याच्या बाहेर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. या रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या तीन महिलांशिवाय काही मोठी सोनोग्राफी केंद्रे आणि आयव्हीएफ सेंटर्सचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाची पथके अनेक ठिकाणी धाडी टाकून पुढील तपास करत आहेत.

प्रकरण काय आहे?

बदलापूरमध्ये हे अवैध स्त्री बीज विक्री रॅकेट एका घरातून चालवले जात होते. आरोपी सुलक्षणा गाडेकर या महिलेने आपल्या घरात बेकायदेशीरपणे स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स साठवून ठेवल्याचा आरोप आहे.

ही प्रक्रिया अत्यंत क्रूर पद्धतीने राबवली जात होती. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून ही इंजेक्शन्स दिली जात. त्यानंतर त्यांच्या गर्भाशयात स्त्री बीज परिपक्व झाल्यावर या महिलांना विशिष्ट IVF सेंटरमध्ये पाठवले जाई. तेथील डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये ही स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही बाब बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने केलेल्या धाडीत उघडकीस आली. याप्रकरणी सुलक्षणा गाडेकर हिच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी होती हेराफेरी? अंड्यांची ने-आण कुठे?

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, स्त्री बीज दान करणाऱ्या महिलांना १५ ते २० हजार रुपये दिले जात होते. तर या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये मानधन मिळत होते. काढण्यात आलेली स्त्री स्त्री बीज तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये पाठवली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आरोपीच्या पतीचा दावा

दरम्यान, आरोपी सुलक्षणा गाडेकरचे पती संजय वर्मा यांनी आपल्या पत्नीला फसवण्यात आल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "माझी पत्नी केवळ एक मध्यस्थ होती. ती महिलांना प्रक्रियेची माहिती देत असे. महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच तिच्या पतीची परवानगी आणि स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे घेतल्यानंतरच तिला डॉक्टरांकडे पाठवले जाई. यासाठी तिला तीन हजार रुपये मानधन मिळत असे. दात्या महिलेला सुमारे पंधरा दिवस इंजेक्शन्स दिली जात. त्यानंतर तयार झालेली अंडी वैद्यकीय प्रक्रियेद्वारे काढून घेतली जात."

पोलिसांनी आता या प्रकरणातील इतर डॉक्टरांच्या भूमिकेची चौकशी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...