⚡ ब्रेकिंग News

आटपाडी शहर 'स्वच्छ व सुंदर' करण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या सभापती सौ संध्या अनिल पाटील ॲक्शन मोडवर

 आटपाडी शहर 'स्वच्छ व सुंदर' करण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या सभापती सौ संध्या अनिल पाटील ॲक्शन मोडवर; मांस विक्रेते आणि ठेकेदारांना कडक सूचना

आटपाडी:

आटपाडी शहराचे आरोग्य आणि स्वच्छता अधिक सक्षम करण्यासाठी आज आटपाडी नगरपंचायतमध्ये विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता सभापती सौ. संध्या अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली.

मांस विक्रेत्यांना स्वच्छतेचे आवाहन

या बैठकीत शहरातील मटण, चिकन आणि मासे विक्रेत्यांना पाचारण करण्यात आले होते. उघड्यावरील कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या विक्रेत्यांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. दुकान परिसरातील कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याबाबत त्यांची जाणीव करून देण्यात आली.

स्वच्छता ठेकेदारांना तंबी

शहरातील कचरा उठाव आणि साफसफाईची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांनाही या बैठकीत पाचारण करण्यात आले होते. आटपाडीतील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी आणि शहर 'स्वच्छ व सुंदर' करण्यासाठी कामात कोणतीही कसर सोडू नये, अशा सूचना सभापतींनी दिल्या. कामात हलगर्जीपणा झाल्यास कारवाईचे संकेतही यावेळी देण्यात आले.

लोकप्रतिनिधींची उपस्थिती

या बैठकीला नगरपंचायत समितीचे सदस्य तथा नगरसेवक अजित जाधव, नगरसेवक संतोष लांडगे, सामाजिक कार्यकर्ते इजि. महेशकुमार पाटील यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नगरपंचायतीचे संबंधित कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधीही यावेळी हजर होते.

"आटपाडी शहराचे सौंदर्य टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन यावेळी सौ. संध्या पाटील यांनी केले.






Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...