⚡ ब्रेकिंग News

नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा 'फुसका' बार; दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी धुव्वा, कोट्यवधी चाहत्यांचे हृदय तुटलं

 नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा 'फुसका' बार; दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी धुव्वा, कोट्यवधी चाहत्यांचे हृदय तुटलं

अहमदाबाद :-  नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय चाहत्यांचे तुटलेले हृदय... हे समीकरण जणू कायमचंच स्थिरावल्यासारखं दिसतंय. २०२३ च्या वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची आठवण अजून ताजी असतानाच, आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत टीम इंडियाला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांचा मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताची सेमीफायनलची वाट बिकट झाली असून, अहमदाबादचे मैदान भारतासाठी 'अनलकी' ठरत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

बुमराह-अर्शदीपची धार, मात्र मिलर-स्टब्सचा तांडव

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या २० धावांत त्यांनी तीन बळी गमावले. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर ढेर झाले. मात्र, डेव्हिड मिलर (६३ धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद ४४ धावा) यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १८८ धावांचे आव्हान ठेवले. डेवाल्ड ब्रेविसनेही ४५ धावांची खेळी केली.

भारताची सलामीच धूळ चाटली; ३१ धावांत ३ बळी

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची अवस्था दयनीय झाली. पॉवरप्लेच्या सहा षटकांतच भारताने ३१ धावांवर तीन बळी गमावले. ईशान किशन शून्यावर बाद झाला, तर तिलक वर्मा १ धावेवर आणि अभिषेक शर्मा १५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. वॉशिंग्टन सुंदरने ११ धावा केल्या; मात्र त्यालाही मोठा डाव खेळता आला नाही. कोणत्याही फलंदाजाला दमदार खेळी करता न आल्याने संपूर्ण संघ लक्ष्यापासून दूर राहिला आणि भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

समीकरणे बिघडली; पुढचे सामने 'करो या मरो'

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ फेरीत आपले खाते उघडले असून संघाला २ गुण मिळाले आहेत. मात्र, भारतासाठी हा पराभव मोठा धक्का असून उपांत्य फेरीची समीकरणे बिघडली आहेत. आता सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे.

भारताचे पुढील सामने असे:

- २६ फेब्रुवारी – झिम्बाब्वे विरुद्ध, चेन्नई

- १ मार्च – वेस्ट इंडिज विरुद्ध, कोलकाता



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...