⚡ ब्रेकिंग News

छत्रपती संभाजीनगर : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचा गूढ उलगडा; प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली लेकीची हत्या

 छत्रपती संभाजीनगर : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचा गूढ उलगडा; प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली लेकीची हत्या

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध करत एका आईने आपल्या २० वर्षीय मुलीचा प्लास्टिक पाईपने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गादीत गुंडाळून टाकण्यात आला होता.

ही घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्रीची असून, तिसगाव चौफुली पुलाजवळ हा प्रकार उघडकीस आला. वडगाव कोल्हाटी येथील भारती साबळे हिच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांनी तपास केला असता हा खून समोर आला.

नेमके काय घडले?

मृत तरुणीचे नाव नंदिनी राजू धिवरे (वय २०) आहे. ती आई भारती साबळेसोबत वडगाव कोल्हाटी येथे राहत होती. नंदिनीचे कन्नड येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नासाठी ती आग्रही होती; मात्र आई भारती हिचा या नात्याला विरोध होता. याच कारणातून दोघींमध्ये सातत्याने वाद सुरू होता. या रागातून आईने प्लास्टिक पाईपने मुलीचा गळा आवळून निर्घृण खून केला.

असे उघडकीस आले प्रकरण

खून केल्यानंतर पुरावा लपविण्यासाठी आईने मृतदेह एका गादीत गुंडाळून दोरीने घट्ट बांधला. घरातील ड्रम आणि इतर साहित्यासह ही गादी घेऊन ती एका रिक्षाने वडगाववरून तिसगाव चौफुलीकडे निघाली. तिला हे सामान गावी न्यायचे असल्याचे सांगितले.

मात्र, रिक्षाचालकाच्या संशयी वृत्तीमुळे हा प्रकार उघडकीस आला. रिक्षात गादी गुंडाळलेली पाहून त्याला संशय आला. त्याने ताबडतोब डायल ११२ ला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तिसगाव चौफुली येथे पोहोचून गादीची तपासणी केली. गादी उघडली असता त्यात नंदिनीचा मृतदेह आढळून आला.

यावेळी आई भारतीने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले; मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी भारती उमेश साबळे (वय ३५) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. प्रेमप्रकरणातील वाद हेच या हत्येचे कारण असल्याचे तपासात उघड झाले आहे.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...