⚡ ब्रेकिंग News

सांगलीत प्रथमच महिलांसाठी विशेष 'हज प्रशिक्षण' शिबिर संपन्न ​सांगली:

 सांगलीत प्रथमच महिलांसाठी विशेष 'हज प्रशिक्षण' शिबिर संपन्न

​सांगली: महाराष्ट्र राज्य हज समिती, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, 'खिदमत हुज्जाज कमिटी, सांगली' च्या वतीने जिल्ह्यातील महिला हज यात्रेकरूंसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महिलांना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, शंका आणि धार्मिक विधींची सविस्तर माहिती महिलांकडूनच मिळावी, या उद्देशाने हे शिबिर शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी सांगलीतील फुलबन हॉल, नळभाग येथे पार पडला.

​या शिबिरात महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी सांगली जिल्ह्याच्या हज इन्स्पेक्टर समीना नालबंद यांनी पार पाडली. या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले:

​प्रवास व दक्षता: महाराष्ट्र राज्य हज समितीच्या सेक्शन ऑफिसर खदीजा नाईकवाडे यांनी झूम मीटिंगद्वारे प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी आणि नियमावली यावर अनमोल मार्गदर्शन केले.

​धार्मिक मार्गदर्शन: आलिमा आपा यांनी हज यात्रेच्या धार्मिक विधींचे पालन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

​तांत्रिक सहाय्य: मुनीर खान बाणदार, इम्रान मोमीन आणि जैद आत्तार यांनी प्रोजेक्टर व साऊंड सिस्टीमद्वारे प्रशिक्षणाचे तांत्रिक नियोजन सांभाळले.

​जिल्ह्यातून सुमारे १०० महिला हज यात्रेकरूंनी प्रत्यक्ष उपस्थित राहून, तर १५ महिलांनी ऑनलाईन पद्धतीने या शिबिराचा लाभ घेतला. प्रवासात महिलांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत समीना नालबंद यांनी मार्गदर्शन करत सर्वांचे स्वागत केले.

​कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यात्रेकरूंना चहा-बिस्किटांचे वाटप करण्यात आले. देशात सुख, शांती आणि ऐक्य राहावे, तसेच यात्रेकरूंची सेवा करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सामूहिक 'दुआ' करण्यात आली.

​खिदमत हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष हाजी मुनीरभाई आत्तार यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. अशा प्रकारचे महिलांसाठीचे स्वतंत्र शिबिर सांगलीत प्रथमच झाल्याने सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...