दिघंची येथील घणचक्रे मळा परिसरात ओढ्यावर पूल बांधण्याची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन सादर
दिघंची: येथील घणचक्रे मळा परिसरातील ओढा पात्रावर पूल नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन त्यांना पुलाच्या कामाबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यानंतर या भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचा संपर्क तुटतो. ही समस्या गंभीर असून तातडीने पूल मंजूर करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांनी या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून संबंधित विभागाकडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर:
यावेळी माजी सरपंच हणमंतराव देशमुख, शहाजी रंगनाथ मोरे, पोपटराव भगत, राजू बुधावले, सिद्धेश्वर नरळे, मच्छिंद्र मोरे यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.