⚡ ब्रेकिंग News

'शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा देवेंद्र फडणवीस!' सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने; 'ठाकरेंची जत्रा' म्हणत विरोधकांना डिवचलं


  '४०-५० वर्षांची दादागिरी मोडून काढली'; 'गाय धुता येईल का?' म्हणणाऱ्यांना टोला; फळबाग शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात धसांचं वक्तव्य; दुष्काळ जाहिर झाल्याने शेतकऱ्यांना मिळणारे १३ फायदे समजून घ्या

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

बीड / आष्टी - बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित फळबाग शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राजकीय विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळ (Drought) आणि मदतीचा उल्लेख करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत विरोधकांच्या दौऱ्यांवर "ठाकरेंची जत्रा" असा जोरदार टोला लगावला.

मेळाव्यात बोलताना सुरेश धस यांनी बीडमधील कथित 'आंतरराष्ट्रीय नेत्या' चा उल्लेख करत भूतकाळातील टीकेचा समाचार घेतला.

ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना "शहरी भागाचा मुख्यमंत्री" म्हटले होते आणि "गाय धुता येईल का?" अशी टीका केली होती, त्यांच्यावर धसांनी निशाणा साधला.

"जिल्ह्यातील चाळीस-पन्नास वर्षांची दादागिरी मोडून काढण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे," असा दावा धस यांनी केला.

तसेच संकटग्रस्त फळबागांसाठी हेक्टरी ६ लाख ५५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी व्यासपीठावरून केली.

सुरेश धस म्हणाले की, "विरोधी पक्षाचे लोक कशाला हिंडत आहेत सध्या? हिंडायची काय गरज आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तीन जिल्ह्यांचा चार दिवसांपूर्वी दौरा केला. सोलापूर, धाराशिव आणि लातूर."

"साहेबांनी लातूरला स्टेटमेंट केले की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. केलंय का नाही? मग परत जाऊन काय ठाकरेंची जत्रा... राज्याचे मुख्यमंत्री जर बोललेत ना, तुम्हाला दसरा आणि दिवाळीच्या मध्ये अकाउंटवर पैसे येणार आहेत. हे राज्याचे मुख्यमंत्री बोलले."

"जे मुख्यमंत्री त्यांच्या कालावधीत दोनदा कर्जमाफी झाली, आता सुद्धा कर्जमाफी झाली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, असं मी जबाबदारीने बोलतोय," असे त्यांनी म्हटले.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना खालील १३ प्रमुख फायदे मिळणार आहेत:

१. जमीन महसुलात सूट

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे.

२. पीक कर्जाचे पुनर्गठन

पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.

३. कर्ज वसुलीला स्थगिती

शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे.

४. कृषीपंपाच्या वीजबिलात सूट

कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट देण्यात येणार आहे. ७.५ हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ आहे, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट देण्यात येणार आहे.

५. परीक्षा शुल्कात माफी

शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे.

६. रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करण्यात येणार आहेत.

७. पिण्याचे टँकर्स

आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवण्यात येणार आहेत.

८. वीजजोडणी खंडित नाही

टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही.

९. अन्नधान्य पुरवठा

शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवण्यात येणार आहे.

१०. जनावरांचा चारा

जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे (चारा चावणी).

११. जलसंधारणाची कामे

जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत.

१२. पाण्याचे नियोजन

पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरूच ठेवण्यात येणार आहे.

१३. पंचनाम्याची कार्यवाही

पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

| मुद्दा | तपशील |

| मेळावा | फळबाग शेतकऱ्यांचा संवाद मेळावा, आष्टी |

| वक्ते | आमदार सुरेश धस |

| मुख्यमंत्र्यांवर स्तुती | 'शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा' |

| विरोधकांवर टोला | 'ठाकरेंची जत्रा' |

| मागणी | फळबागांना हेक्टरी ६.५५ लाख मदत |

| दुष्काळ | १३ प्रमुख फायदे |

| जमीन महसूल | सूट |

| कर्ज | पुनर्गठन, वसुली स्थगिती |

| वीजबिल | कृषीपंपांना सूट |

| पंचनामे | तत्काळ; छायाचित्र, जीपीएस |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...