⚡ ब्रेकिंग News

राष्ट्रवादीचे विलिनीकरण एकाच मुद्द्यावर! शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हा; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सांगितली पवारांची भूमिका


  'आम्ही कोणासोबत जाणार नाही; यायचं असेल तर आमच्यासोबत या'; अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा होती; 'आता तो मुद्दा नाही'; महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र यावं; ज्ञानेश कुमारविरोधातील मोर्चाबाबत भूमिका

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर सातत्याने सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आता खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीच भाष्य केले आहे.

"आम्ही कोणासोबत जाणार नाही, जर कोणाला यायचं असेल तर आमच्यासोबत यावं," असं शरद पवार म्हणाले.

त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केली. "राष्ट्रवादीचे विलिनीकरण एकाच मुद्द्यावर होईल आणि ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं," असं शशिकांत शिंदे म्हणाले.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केले. त्यानंतर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा सुरू होती.

"शरद पवारांच्या सूचनेनुसार विलिनीकरण करण्यात यावं, असं ठरलं होतं," असंही शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, "विलिनीकरणाची चर्चा सातत्याने सुरू होती. पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ होते, अशा प्रकारचं चित्र रंगवलं जात होतं. त्यावर आता पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली. आता विलिनीकरणाचा मुद्दा नाही. पण ज्यांना विलिनीकरण करायचं आहे, त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं. शरद पवारांची हीच भूमिका आहे."

"अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. अजित पवार असताना काही मुद्दे ठरले होते. पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे त्या गोष्टी करण्याचं ठरलं होतं. मात्र त्यांच्या जाण्यानंतर हा मुद्दा मागे पडला. त्यांच्यानंतरही विलिनीकरणाची चर्चा सातत्याने सुरू होती. त्यावर आता पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे," असं शशिकांत शिंदे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, शरद पवार एनडीएसोबत जाणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या. पंतप्रधान मोदींसोबत पवारांच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली होती.

आज एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं. "आमच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, मात्र आम्ही कोणासोबत जाणार नाही. कोणाला यायचं तर आमच्यासोबत यावं," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हा अप्रत्यक्षरित्या संदेश दिल्याची चर्चा आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवर पवारांनी हे महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र यावं आणि एकत्रित आंदोलन करावं, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली.

"सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तर त्याचा परिणाम अधिक होईल," असंही ते म्हणाले.

दोन्ही ठाकरेंच्या गटाकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचं नियोजन सुरू आहे.

त्यावरही शशिकांत शिंदे यांनी भाष्य केलं. "या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्याकडे कोणतेही निमंत्रण आलं नाही. मात्र त्यांच्याकडून निमंत्रण आलं तर त्यावर आम्ही विचार करू," अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली.

| मुद्दा | तपशील |

| विलिनीकरण | शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हा |

| पवारांचे वक्तव्य | 'आम्ही कोणासोबत जाणार नाही' |

| प्रदेशाध्यक्ष | शशिकांत शिंदे |

| अजित पवार | असताना विलिनीकरणाची चर्चा होती |

| महाविकास आघाडी | एकत्र आंदोलनाची भूमिका |

| ज्ञानेश कुमार मोर्चा | ४ ऑक्टोबर; निमंत्रण आलं नाही |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...