⚡ ब्रेकिंग News

माणदेशी संघर्ष योद्धा: अभयसिंह जगताप

 


माणदेशी संघर्ष योद्धा: अभयसिंह जगताप यांचा आज वाढदिवस; जाणून घ्या एका 'इंजिनिअर' ते 'जननायक' बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

माण-खटाव (क्रांती न्यूज विशेष प्रतिनिधी): विशाल माने 

सत्ता असो वा नसो, आपल्या मातीशी आणि जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू न देणारे नेतृत्व, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे प्रदेश युवक सरचिटणीस आणि माणदेशातील संघर्षाचे पर्याय ठरलेले अभयसिंह जगताप (उर्फ अभयदादा). आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्ताने एका यशस्वी उद्योजकाचा जनसामान्यांचा नेता बनण्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

उच्चशिक्षित अभियंता ते जागतिक उद्योजक

अभयसिंह जगताप यांचा जन्म १७ मे १९७८ रोजी वरकुटे-मलवडी येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची (B.E.) पदवी घेतली. त्यानंतर नागपूरमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक. (M.Tech) पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांनी स्पर्धा परीक्षा (MPSC) उत्तीर्ण करून शासकीय सेवेत वर्ग-१ (Class-1) च्या सहाय्यक अभियंता पदावर निवड मिळवली होती. मात्र, सरकारी नोकरीला कवेत घेण्याऐवजी त्यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडला.

इजिप्तमधील कैरो येथील नामांकित 'दार ग्रुप'मध्ये काम केल्यानंतर, २०१३ मध्ये त्यांनी पुण्यात 'शौर्य टेक्नॉसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड' या आयटी कंपनीची स्थापना केली. एका छोट्या खोलीतून सुरू झालेली ही कंपनी आज जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.

'महाखनीज' प्रणालीतून शासनाला कोट्यवधींचा महसूल

अभयदादा यांच्या 'शौर्य टेक्नॉसॉफ्ट'ने विकसित केलेली 'महाखनीज' ही डिजिटल प्रणाली आज राज्य सरकारच्या खनिज उत्खनन, वाहतूक आणि महसूल संकलनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे सरकारच्या महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. याशिवाय त्यांची कंपनी कृषी, डेअरी, रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातही सॉफ्टवेअर सेवा पुरवत असून, हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

 राजकीय व सामाजिक वारसा

अभयदादा यांना समाजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील कै. खाशेराव बापू हे माण पंचायत समितीचे सभापती व कुकुडवाड गटातून जिल्हा परिषद सदस्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी खाशेराव बापूंच्या बहुआयामी नेतृत्वाची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्य जलआपूर्ती मंडळाच्या त्रिसदस्यीय समितीवर नियुक्ती केली होती, ज्यातून सातारा जिल्ह्यात अनेक पाणी योजना साकारल्या. तसेच, १९९७ मध्ये कुकुडवाड जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित झाला, तेव्हा अभयदादांच्या मातोश्री कै. कांचनमाला जगताप यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक जिंकून सामाजिक कार्याचा आलेख उंचावला.

कोरोना काळातील देवदूत आणि क्रीडा क्षेत्राला बळ

कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात अभयदादांनी लोकवर्गणीतून वरकुटे-मलवडी येथे ६० बेडचे कोव्हिड रुग्णालय, सात ऑक्सिजन बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्याचे कौतुक तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केले होते.

क्रीडा क्षेत्राविषयी असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावी सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पैलवानांना आरोग्य विमा कवच आणि मासिक मानधन सुरू करणारे ते जिल्ह्यातील पहिले नेते ठरले आहेत.

पक्षाशी एकनिष्ठता आणि संघर्ष

नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवली. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कटारखटाव गटातून भाजपच्या धनंजय चव्हाण यांच्याविरुद्ध लढताना अभयसिंह जगताप यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांनी घेतलेल्या लढतीमुळे कुकुडवाड गटात महाविकास आघाडीचे अनिल देसाई विजयी झाले. या निकालावर 'किल्ला आला, पण सिंह गेला' अशीच भावना मतदारांनी व्यक्त केली. म्हासवड नगरपालिकेतही त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना तिकीट देऊन विरोधकांना तगडे आव्हान दिले आहे.

उद्योजकतेच्या शिखरावर असूनही आपल्या माणदेशी मातीशी प्रामाणिक राहणारे अभयसिंह जगताप आजच्या तरुणाईसाठी एक खरे प्रेरणास्थान आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...