⚡ ब्रेकिंग News

आटपाडी मार्केट यार्डात २४ मे पासून भव्य 'आंबा महोत्सव'; आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना सुवर्णसंधी, स्टॉल सुविधा मोफत!

 


आटपाडी मार्केट यार्डात २४ मे पासून भव्य 'आंबा महोत्सव'; आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना सुवर्णसंधी, स्टॉल सुविधा मोफत!

क्रांती न्यूज - संपादक - सचिन मेनकुदळे​

आटपाडी:

कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी आणि कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आटपाडी येथील मुख्य बाजार आवार (मार्केट यार्ड) येथे भव्य 'आंबा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रविवार, दिनांक २४ मे २०२६ ते गुरुवार, २८ मे २०२६ अखेर चालणार आहे. तालुक्यातील शेतकरी आणि आंबाप्रेमी ग्राहकांसाठी हा महोत्सव म्हणजे एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

​या आंबा महोत्सवामध्ये तालुक्यातील हापूस, केशर, पायरी, लालबाग, तोतापूरी, बदामी आणि स्थानिक (लोकल) अशा विविध दर्जेदार जातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समितीच्या वतीने विनामूल्य (मोफत) स्टॉल, पिण्याचे पाणी आणि विजेची (लाईट) उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​या महोत्सवामुळे ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय (दलाल) थेट शेतकऱ्यांच्या बागेतील नैसर्गिकरीत्या पिकलेला आणि ताजा आंबा रास्त दरात खरेदी करता येणार आहे.

"तालुक्यातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला आंबा विक्रीसाठी आणून या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. तसेच, आटपाडी तालुक्यातील आंबा खरेदीदार ग्राहकांनीही या महोत्सवाला भेट देऊन भरघोस खरेदी करावी."

— मा. पै. संतोष (भाऊ) पुजारी (सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी)

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...