नाशिक/मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला होता. त्यांनी अशोक खरातच्या मोबाईलचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) समोर आणल्याचा दावा केला. या सीडीआरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातला तब्बल १७ वेळा फोन केल्याची नोंद असल्याचे दमानिया यांनी सांगितले. या दाव्यानंतर विरोधकांनी “सीडीआर अंजली दमानियांकडे कुठून आला?” असा सवाल उपस्थित केला. आता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर खुलासा केला. यावेळी त्या भावनिक झाल्या आणि अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “३१ तारखेपासून कालपर्यंत मी मुंबईत नव्हते. चंडीगडमध्ये कोणताही मराठी मीडिया नव्हता. मला माझी प्रतिक्रिया तिथे देता येईना. राऊत बोलतात मी रॉ एजंट आहे का? अंधारे यांचा तर विषयच दमानिया असतो. मला सुरुवातीपासून सगळं सांगायचं आहे.”
ते पुढे म्हणाल्या, “१ एप्रिलला दुपारी १ वाजता मला एक फोन आला. ‘खरातची माहिती माझ्याकडे आहे, खरातचा सीडीआर माझ्याकडे आहे,’ असं त्याने सांगितलं. मला सांगितलं की, तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. त्याने मला सगळं पाठवलं. रात्री मला वेळ मिळाला, तेव्हा मी सगळं बघितलं. मला त्यात कंपनीचे नाव वगैरे सगळं आलं. एक्सेल शीट खरी आहे का? हे तपासायला मी क्लाउडवर टाकलं.”
अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली
पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप रन केली. त्या म्हणाल्या, “मी हे सदानंद दाते यांना पाठवलं आहे. मुद्दाम हे माझ्यापर्यंत पोहोचवून दाखवले आहे का? ॲक्टिव्हिस्टला कधी कधी वापरलं देखील जातं. आता या माहितीचे असिसमेंट कसं दाखवलं जातं? कॉल हिस्ट्री घातल्याने मी सीडीआर घातला, तेव्हा सविस्तर माहिती आली. मी अनधिकृत गोष्टी मागत नाही. माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली. तेजस्वी सातपुते आणि गृहमंत्र्यांना माहिती पाठवली.”
मिलिंद नार्वेकर यांचे ८ कॉल, शिंदे यांचे पीए प्रभाकर काळे
अंजली दमानिया यांनी सांगितले, “देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, गिरीश महाजन, सुषमा अंधारे, विखे पाटील, मोहित कंबोज, प्रसाद लाड इत्यादी लोकांचे खरातबरोबर कॉल नव्हते. मिलिंद नार्वेकर यांचे ८ कॉल आले. काय बोलता अंधारे बाई? लढायचे कोणासोबत अंधारे बाई? तुम्ही राजकारण करतायत. यात समरी येते, इन्कमिंग, आऊटगोईंग, सर्वात मोठे कॉल अशी माहिती येते. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर यांचे कॉल रेकॉर्ड त्यांच्याबरोबर मिळाले. प्रभाकर काळे एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत. कॉल काळेंनी केले की शिंदेंनी केले? याबाबत मला घेणं-देणं नाही. मात्र, याची चौकशी झाली पाहिजे.”
अंजली दमानियांना अश्रू अनावर
पत्रकार परिषदेत अंजली दमानिया भावनिक झाल्या. त्या म्हणाल्या, “समता पतसंस्थेचे जानेवारी महिन्यात एसएमएस आले आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. अनेक महिने असे मॅसेज नव्हते. काय देवाणघेवाण झाली? काय व्यवहार झालेत? याची चौकशी झाली पाहिजे. समतेची काय उलाढाल झाली? हेच निदर्शनास आणून द्यायचं होतं. मुख्यमंत्र्यांना सांगून काही उपयोग नाही. कारण ते राजकारणच करु इच्छितात. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पार्थ पवार यांचा रिपोर्ट दिला. मला आता फक्त सदानंद दाते यांच्याकडून आशा आहे. मी त्यांना माहिती देणार आहे.”
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “माझे डोळे झिजले पण मी ते शोधले. शिंदेंचे इतके कॉल बाहेर काढायची हिंमत आहे का यंत्रणेची? शिंदेंना विचारायची गरज नाही का? का इतके कॉल केलेत?”
अंजली दमानियांचा मुख्य दावा
अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले की, १ एप्रिलला दुपारी एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने त्यांना फोन करून खरातचा सीडीआर पाठवला. त्यांनी तो क्लाउडवर तपासला आणि खरा असल्याचे पाहिले. नंतर त्यांनी सदानंद दाते, तेजस्वी सातपुते आणि गृहमंत्र्यांना ही माहिती पाठवली. त्यांनी अनधिकृत माहिती मागितली नाही, फक्त यंत्रणांना दिली.
प्रकरणाचे महत्त्व
अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांनी सीडीआर समोर आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल, मिलिंद नार्वेकर यांचे ८ कॉल आणि इतर नेत्यांच्या कॉल्सची नोंद असल्याचा दावा केला गेला. दमानिया यांनी “ॲक्टिव्हिस्टला कधी कधी वापरलं जातं” असेही म्हटले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून उपयोग नसल्याचे सांगितले आणि सदानंद दाते यांच्याकडून आशा व्यक्त केली.
अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाल्याने प्रकरण अधिक भावनिक झाले. त्या म्हणाल्या, “मला फक्त सत्य समोर आणायचे होते. यंत्रणांनी याची चौकशी करावी.”
अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांनी सीडीआर कुठून आला याचा खुलासा करताना भावनिक झाल्या. त्यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडून माहिती मिळाल्याचे सांगितले आणि यंत्रणांना दिल्याचे स्पष्ट केले. प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह इतर नेत्यांच्या कॉल्सची नोंद असल्याचा दावा केला गेला. दमानिया यांनी सदानंद दाते यांच्याकडून आशा व्यक्त केली. पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांनी सीडीआर समोर आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत त्यांनी “१ एप्रिलला प्रायव्हेट डिटेक्टिव्हने फोन केला” असे सांगितले आणि अश्रू अनावर झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल, मिलिंद नार्वेकर यांचे ८ कॉल असल्याचा दावा केला. दमानिया यांनी यंत्रणांना माहिती दिल्याचे स्पष्ट केले आणि सदानंद दाते यांच्याकडून आशा व्यक्त केली. प्रकरणात चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.