⚡ ब्रेकिंग News

इराणच्या ३२ युद्धनौका बुडाल्या, मात्र भारताच्या आश्रयाने एक जहाज वाचलं; अमेरिकेच्या हल्ल्यात 'लावन'चे नेमकं काय झालं?

  इराणच्या ३२ युद्धनौका बुडाल्या, मात्र भारताच्या आश्रयाने एक जहाज वाचलं; अमेरिकेच्या हल्ल्यात 'लावन'चे नेमकं काय झालं?

 अमेरिकेने श्रीलंकेत बुडवलं 'आयआरआयएस देना'; त्याच दिवशी कोचीत दाखल झालं इराणचं दुसरं युद्धनौका 'लावन'

अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणच्या ३२ युद्धनौका समुद्रात बुडवल्या गेल्या. मात्र याच हल्ल्यादरम्यान इराणचे एक युद्धजहाज भारतामुळे सुरक्षित राहिल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे भारताकडे आश्रय मागितल्यानंतर कोची बंदरात तैनात असलेल्या या जहाजाने मोठी दुर्घटना टळल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमकं काय घडलं?

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. त्याच दिवशी इराणने भारताकडे तांत्रिक अडचणींमुळे 'आयआरआयएस लावन' या जहाजाला तातडीने डॉकिंगची परवानगी मागितली होती. भारताने १ मार्च रोजी ही विनंती मान्य करत जहाजाला कोची बंदरात प्रवेश दिला. ४ मार्च रोजी अमेरिकेने श्रीलंकेजवळ इराणचे 'आयआरआयएस देना' हे जहाज बुडवले, त्याच दिवशी 'लावन' हे जहाज सुरक्षितपणे कोची बंदरात पोहोचले. सध्या या जहाजावरील सर्व १८३ खलाशी कोची येथील भारतीय नौदलाच्या तळावर सुरक्षित वास्तव्यास आहेत.

अमेरिकेचा हल्ला आणि बचावकार्य

'मिलान' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन इराणला परतत असताना, बुधवारी सकाळी श्रीलंकेतील गॅले किनाऱ्यापासून ४० नॉटिकल मैल अंतरावर अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडो डागून 'आयआरआयएस देना' हे इराणचे युद्धजहाज बुडवले. या हल्ल्यानंतर श्रीलंकेला समुद्रातून ८७ जणांचे मृतदेह सापडले.

'देना' जहाजाकडून मदतीचा संदेश मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू केली होती. नौदलाने लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान, आयएनएस तरंगिणी हे जहाज आणि कोचीहून आयएनएस ईक्षक हे सर्वेक्षण जहाज श्रीलंकेच्या मदतीसाठी घटनास्थळी पाठवले होते.

भारत सरकारच्या भूमिकेवरून वाद

इराणी युद्धनौका बुडवल्यानंतर देशातील विरोधी पक्षांसह संरक्षण तज्ञांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इराणच्या खलाशांना "भारताचे सन्माननीय पाहुणे" म्हणत सरकारने सागरी महासत्ता म्हणून आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

इराण आणि अमेरिकेची प्रतिक्रिया

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या या कारवाईला "समुद्रातील क्रूरता" म्हटले असून अमेरिकेला याचा 'कडवा पश्चात्ताप होईल' असा इशारा दिला आहे. बुडवलेल्या या जहाजावर सुमारे १३० खलाशी होते. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी या टॉर्पेडो हल्ल्याची पुष्टी करत 'देना' जहाजाला एक "प्राईज शिप" म्हटले आहे. तसेच, अमेरिका-इस्रायलची ही लष्करी कारवाई आता केवळ इराणच्या सीमेपुरती मर्यादित राहिलेली नसल्याचेही ते म्हणाले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...