⚡ ब्रेकिंग News

मैत्रिणी चिडवायच्या, 'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील'; मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा प्रियकराच्या छळाला कंटाळून टोकाचा निर्णय

 

 मैत्रिणी चिडवायच्या, 'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील'; मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा प्रियकराच्या छळाला कंटाळून टोकाचा निर्णय

 डेटिंग अॅपवर ओळख, प्रियकराच्या छळाने घेतला जीव; डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने मुंबई हादरली

मुंबईत एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ८ मार्च रोजी या तरुणीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केली होती. ही तरुणी डॉक्टर (Doctor) असून तिचे नाव स्तुती बजरंग सोनावणे असे होते. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्याने डॉ. स्तुती बजरंग सोनावणे (Stuti Sonawane) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (३१) याला लोअर परळ (Lower Parel) येथून अटक केली. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. स्तुती सोनावणे यांच्या आत्महत्येमुळे मुंबई परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यात फजल मोहम्मद खानकडून सतत मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे. फजलच्या छळाची माहिती स्तुतीने आपल्या मैत्रिणीला दिली होती. त्यात तो "तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील" असे वारंवार म्हणायचा, असे तिने सांगितले होते. स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळख एका डेटिंग अॅपवरून झाली. त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारून टाकण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या सगळ्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ८ मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता, स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. या तपासातून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...