मुंबई : ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या चित्रपटांमधील एसएसपी अस्लम चौधरी या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते संजय दत्त अलीकडेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले. या इव्हेंटमध्ये संजय दत्तचा मुलगा शहरान दत्तने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दत्त फॅमिलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शहरानच्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या या खास इव्हेंटसाठी संजय दत्त यांनी पठाणी परिधान केली होती, तर पत्नी मान्यता दत्त यांनी शिमरी हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. संजय दत्तची मुलगी इकरा दत्तने अॅनिमल प्रिंट टॉपवर ब्लॅक स्कर्ट घालून आपल्या क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती संजय दत्तच्या मुलगा शहरान दत्तची.
‘छोटा बाबा’ म्हणून नेटकऱ्यांकडून कौतुक
दत्त कुटुंब इव्हेंटमध्ये पोहोचताच पापाराझींनी त्यांच्याभोवती घेराव घातला. यावेळी शहरान दत्तचा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्याचे विशेष कौतुक केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करताना शहरानला ‘छोटा बाबा’ असे संबोधले आहे.
एका युझरने लिहिले, “2028 मध्ये न्यू संजू बाबा येतो आहे.” तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, “छोटा संजू बाबा.” तर काही नेटकऱ्यांनी संजय दत्तच्या मुलीच्या क्यूटनेसचेही कौतुक केले.
जुळ्या मुलांचे वडील झाले संजय दत्त
उल्लेखनीय म्हणजे, संजय दत्त यांनी २००८ मध्ये मान्यता दत्तशी लग्न केले. लग्नानंतर मान्यता यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. शहरान आणि इकरा अशी या जुळ्या मुलांची नावे आहेत. २१ ऑक्टोबर रोजी संजय दत्त या दोन जुळ्या मुलांचे वडील झाले.
सध्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या चित्रपटांमधील संजय दत्तच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. या यशानंतर आता त्याच्या मुलानेही सोशल मीडियावर आपल्या लूकने धुमाकूळ घातला आहे. दत्त चाहत्यांसाठी ही खास भेट ठरली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.