⚡ ब्रेकिंग News

नवरात्री, गुढीपाडवा, उगादी आणि चेती चांदच्या शुभेच्छा; पंतप्रधान मोदींनी विविध राज्यांच्या भाषेतून दिला संदेश

नवरात्री, गुढीपाडवा, उगादी आणि चेती चांदच्या शुभेच्छा; पंतप्रधान मोदींनी विविध राज्यांच्या भाषेतून दिला संदेश

गुढीपाडवा, उगादी, चेती चांद, नवरेह आणि साजिबू चेइराओबा सणानिमित्त पीएम मोदींकडून देशवासियांना हार्दिक शुभेच्छा; म्हणाले - नववर्ष आनंद, यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो

नवी दिल्ली: संपूर्ण देशात नवरात्री, गुढीपाडवा, उगादी आणि चेती चांद या सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध राज्यांमध्ये हे सण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आपल्या खास अंदाजात विविध भाषांमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची पूजा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी भावना व्यक्त केल्या. "नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, माता दुर्गेच्या पहिल्या रुपाचे, शैलपुत्री देवीची पूजा करण्यात येते. तिच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात शिस्त, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येवो. कोट्यवधी भारतीयांच्या वतीने मी विश्वमाता, माता दुर्गेच्या चरणी नतमस्तक होतो. जय माता दी!" असे ते म्हणाले.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. "गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी हे जैत आणि समृद्धीचे प्रतिक आहे. हा सण नवीन ऊर्जा, आसा आणि नवीन संधींचा संदेश घेऊन येतो. येणारे नवीन वर्ष सर्वांना आनंद, यश आणि उत्तम आरोग्य लाभो," अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

उगादी सणाच्या शुभेच्छा

उगादी सणानिमित्त पंतप्रधानांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील नागरिकांना त्यांच्याच भाषेत शुभेच्छा दिल्या. "आपका उगादी मंगलमय हो!" आणि "ನಿಮ್ಮ ಯುಗಾದಿ ಸಡಗರದಿಂದ ಕೂಡಿರಲಿ!" अशा शब्दांत त्यांनी तेलुगू आणि कन्नड भाषिकांना शुभेच्छा दिल्या.

चेती चांदनिमित्त सिंधी समाजाला शुभेच्छा

चेती चांद हा सिंधी समाजाचा प्रमुख सण असून तो त्यांचे नववर्ष म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पीएम मोदी म्हणाले, "चेती चांद की हार्दिक शुभकामनाएं! आपके लिए यह वर्ष बहुत ही शुभ हो, ऐसी कामना करता हूं।"

नवरेह आणि साजिबू चेइराओबाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना नवरेह सणाच्या आणि मणिपूरच्या जनतेला साजिबू चेइराओबा या पारंपारिक सणाच्या शुभेच्छा दिल्या. "नवरेह पोश्ते! आने वाला वर्ष आपके लिए बहुत अच्छा हो," असे ते म्हणाले. तर "साजिबू चेइराओबा की शुभकामनाएं। सभी के लिए एक शानदार वर्ष की कामना करता हूं," 

पंतप्रधान मोदींच्या या विविध भाषिक शुभेच्छांमुळे देशातील विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडले असून, त्यांच्या संदेशामुळे उत्सवाचे पवित्र वातावरण अधिकच खुलले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...