⚡ ब्रेकिंग News

'बायकोवर हात उगारला'; बिग बॉस फेम अनुराग डोभालच्या अश्रूंच्या नाटकावर भावाचा पोलखोल, खाजगी चॅट उघडकीस


'बायकोवर हात उगारला'; बिग बॉस फेम अनुराग डोभालच्या अश्रूंच्या नाटकावर भावाचा पोलखोल, खाजगी चॅट उघडकीस

व्ह्यूजसाठी सुरू आहे 'व्हिक्टिम' कार्ड?; भावाने शेअर केले स्क्रिनशॉट्स

नवी दिल्ली : 'बिग बॉस १७' मधील स्पर्धक आण्ही युट्यूबर अनुराग डोभाल याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत कुटुंबीयांवर छळाचे आरोप केले. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याचा भाऊ कलम याने मोठा दावा केला आहे. अनुरागने केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी हे नाटक रंगवल्याचे सांगत त्याने अनुरागचे खाजगी चॅट स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत, ज्यात त्याने पत्नीला मारहाण केल्याची कबुली दिल्याचे दिसून येते.

बिग बॉस फेम युट्युबर अनुराग डोभाल सध्या त्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. त्याने अलीकडेच यूट्यूबवर दोन तासांचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो प्रचंड डिस्टर्ब झालेल्या अवस्थेत दिसतो. या व्हिडिओत त्याने डोळ्यात अश्रू आणत आपल्या कुटुंबीयांवर छळाचे गंभीर आरोप केले. तसेच, या छळामुळेच आपली पत्नी रितिका याने आपल्याला सोडून दिल्याचा दावा त्याने केला. शिवाय, नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्याने या व्हिडिओत सांगितले. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच अनुरागच्या भावाने या सर्व प्रकरणात मोठी उलटफेर केली आहे.

भावाने केली पोलखोल

अनुरागचा भाऊ कलम याने त्याच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कलमने अनुरागचे काही स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, हे सर्व केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेले नाटक आहे. शेअर केलेल्या स्क्रिनशॉट्समध्ये अनुराग आपल्या मित्राशी चॅट करताना दिसतो, ज्यात त्याने स्पष्टपणे कबूल केले आहे की, त्याने आपल्या पत्नीवर हात उगारला होता. कलमच्या दाव्यानुसार, वास्तविकता लपवून अनुराग एकतर्फी गोष्ट सांगत आहे.

कलमचा पॉडकास्ट आणि आरोप

कलमने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करत लिहिले, "मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. सगळे पुरावे माझ्या पॉडकास्ट चॅनलवर आहेत. चिल करा... ही गोष्ट त्याच्यासाठी नवीन नाही. तो नेहमी व्ह्यूजसाठी असे करत असतो." त्याने पुढे लिहिले की, अनुरागने कुटुंबीयांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. "जेव्हा तो कायदेशीररित्या हरला, तेव्हा त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला. रितिकानेही याच कारणामुळे त्याला सोडले," असे कलमने म्हटले आहे. या उलटसुलट आरोपांमुळे आता खरं सत्य काय, याबाबत नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...