⚡ ब्रेकिंग News

"सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय"; पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर राज ठाकरे संतापले, बैठकीत फैलावर

"सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय"; पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर राज ठाकरे संतापले, बैठकीत फैलावर

महिला पदाधिकाऱ्यांनाही फटकारले; म्हणाले, "फक्त हळदी-कुंकू नव्हे, तर महिलांसाठी नवीन काय करता?"

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गोरेगाव पश्चिमेतील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत दहिसर ते वांद्रे या परिसरातील सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. "तुम्ही खाली काय करता, या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात. कुणी काय-काय काम केले हे मला आता बघायचे आहे. सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय. मी आता प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणार आहे. त्यात जर काही चुका आढळल्या तर सोक्षमोक्ष लावेन," असे सुनावत त्यांनी कामात ढिलाई सहन न करण्याचा इशारा दिला.

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. "तुम्ही फक्त हळदी-कुंकू करता; हळदी-कुंकू सोडून महिलांसाठी नवीन काय करता?" असा सवाल करत त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीची पाहणी केली.

बैठकीत राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि आगामी पक्षीय कार्यक्रमांच्या तयारीबाबत आढावा घेतला. "जर नवीन काही करायचे नसेल, तर पक्षाच्या 'नवनिर्माण' नावाला काय अर्थ आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या १९ तारखेला होणाऱ्या पक्षाच्या 'स्वारी'च्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांना अधिक सक्रिय होण्याचे निर्देश दिले. या बैठकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक हालचाली अधिक वेगाने राबविण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना ठोस जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...