⚡ ब्रेकिंग News

अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांची दिल्लीत धाव; केजरीवाल, संजय सिंह यांच्यासोबत चर्चा


अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांची दिल्लीत धाव; केजरीवाल, संजय सिंह यांच्यासोबत चर्चा

विमान अपघाताच्या सखोल चौकशीसाठी संसदेत आवाज उठवण्याची मागणी; डीजीसीएच्या अहवालावर प्रश्नचिन्ह, टीडीपी नेत्यांवर गंभीर आरोप

नवी दिल्ली, दि. ७ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी आता थेट दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता संसदेतही या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी रोहित पवार यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांची भेट घेतली आहे.

संजय सिंह यांच्याकडे मागणी

रोहित पवार यांनी खासदार संजय सिंह यांची भेट घेऊन अजित पवार अपघात प्रकरणी राज्यसभेत मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली. यावेळी रोहित पवार म्हणाले, "जे खासदार संसदेत जोरदार आवाज उठवतात आणि लोकांच्या हितासाठी मनापासून लढतात, अशा खासदारांची भेट घेऊन आम्ही अजित पवार यांच्या अपघाताची माहिती देत आहोत. मराठी माणसाला न्याय मिळत नाही, व्हीएसआर कंपनीविरुद्ध एफआयआर का होत नाही, यासंदर्भातील मुद्दे संसदेत उचलावेत, अशी मागणी आम्ही केली आहे."

१२ नियमांतर्गत तपासाची मागणी

रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपास ११ ऐवजी १२ नियमांतर्गत (रूल १२) व्हावा, अशी मागणी केली आहे. तसेच डीजीसीएमध्ये मोठे बदल व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. संजय सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली.

टीडीपी नेत्यांवर गंभीर आरोप

रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील टीडीपी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "केंद्रीयमंत्री असलेल्या टीडीपीच्या नेत्यांचे व्हीएसआर कंपनीच्या मालकांसोबत चांगले आर्थिक आणि वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे या नेत्यांना मंत्रिमंडळात ठेवणे योग्य नाही. योग्य तपास होणार नाही, म्हणून त्या नेत्याला मंत्रिमंडळातून हटवावे," अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच डीजीसीएने तपास अधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ब्लॅक बॉक्समधील गडबड संशयास्पद – संजय सिंह

रोहित पवार यांच्या भेटीनंतर खासदार संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "मी आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते की ब्लॅक बॉक्समध्ये गडबड असू शकते. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समध्येच गडबड असल्याचे सांगितले जात असल्याने इथेच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे."

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी आता संसदेतही आवाज उठण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनी दिल्लीत केलेल्या या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रासह केंद्राच्या राजकारणातही या प्रकरणाची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत खासदार संजय सिंह यांची भेट घेऊन अजित पवार अपघात प्रकरणी चर्चा केली.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...