⚡ ब्रेकिंग News

आनंदी’ची आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला; दृष्टी गमावलेल्या तरुणीची प्रेरणादायी कथा

जाई खांडेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; अंधत्व हीच ताकद असलेल्या ‘आनंदी’ची गोष्ट स्टार प्रवाहवर

मुंबई : ‘जग केवळ डोळ्यांनी पाहता येतं का, ते मन आणि स्पर्शातूनही अनुभवता येतं...’ या भावनेला स्पर्श करणारी नवी मालिका ‘आनंदी’ आजपासून (३० मार्च) स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दृष्टी गमावलेल्या तरुणीची ही कथा केवळ मनोरंजनाच नव्हे, तर एक सामाजिक संदेशही देणारी आहे.

स्टार प्रवाहवरील मालिका नेहमीच समाजातील वास्तव घटनांशी जोडलेल्या असतात. ‘आनंदी’ या मालिकेत अंध असूनही आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या तरुणीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अपघातात गमावली दृष्टी, मात्र नाही हताश

‘आनंदी’ ही तरुणी जन्मतः अंध नसून, अपघातात तिची दृष्टी गेलेली आहे. दृष्टी गमावल्यानंतरही ती हताश न होता जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. डोळ्यांनी जग अनुभवता न आल्याने ती मनाने, भावनेने आणि स्पर्शाने हे सुंदर जग अनुभवते. तिच्यात अंधत्व ही दुबळेपणा नसून, ताकद आहे. गरजूंना मदत करणे आणि घरातील जबाबदाऱ्या नेटाने पार पाडणे, हे तिचे स्वभाव आहे.

जाई खांडेकरचे मालिकाविश्वात पदार्पण

या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री जाई खांडेकर साकारत आहे. ‘आनंदी’ या मालिकेद्वारे ती मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. अंध तरुणीची भूमिका साकारणे हे आव्हानात्मक असतानाही जाईने ही व्यक्तिरेखा सहजतेने उभी केली आहे.

मालिकेविषयी जाई खांडेकर म्हणाली, “आनंदी नावाप्रमाणेच स्वभावानेही आनंदी असते. ही केवळ भूमिका नसून एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसले तरी ती मनाने आणि स्पर्शाने सगळं अनुभवते. अंध व्यक्ती नेमकी कशी जीवन जगतात, हे दाखवण्यात आलं आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे.”

अंध मुलांच्या संस्थेत घेतला आठवडाभराचा वर्कशॉप

ही भूमिका साकारण्यासाठी जाई खांडेकरने आठवडाभर अंध मुलांच्या संस्थेत जाऊन वर्कशॉप केला. त्या संस्थेतील मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास केला. याबाबत ती म्हणाली, “त्या संस्थेतील मुलांच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आनंदी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच जवळची वाटेल.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या फर्स्ट लुक आणि टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘आनंदी’ ही मालिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...