"नो कोर्ट, नो कचेरी... या नराधमाला प्रत्येकाने एक-एक सुई टोचून मारले पाहिजे" - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर/नागपूर: नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत तीव्र आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुनगंटीवार म्हणाले,
"मी कायद्यावर विश्वास ठेवणारा सुजाण नागरिक आहे. पण जेव्हा टीव्हीवर अशोक खरातचे अघोरी कृत्य पाहतो, तेव्हा माझ्या मनातही येतं की याला कोर्ट-कचेरीची गरज नाही. एक दिवसाचा कायदा बदला आणि या नराधमाला भर चौकात उभं करून सर्वांनी एक-एक सुई टोचून त्याचा अंत करावा. फासावर लटकवले पाहिजे."
ते पुढे म्हणाले,
"हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, जिथे स्त्रीला देवाच्या स्थानावर बसवले जाते. या भोंदू बाबाने स्त्रियांचा अवमान करून महाराष्ट्र आणि देवाचा अपमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी सर्व भोंदू बाबांना स्पष्ट संदेश जावा की — 'याद रखो, तुम्हारी मौत पक्की है!'"
विज्ञानाच्या युगात अघोरी कृत्ये
मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त केली की, २१व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचे शिक्षण दिले जाते, तरीही असे भोंदू बाबा समाजाला त्रास देतात आणि हिंदू धर्मालाही बदनाम करतात.
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर भाष्य
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले,
"जेव्हा गंभीर आरोप होतात, तेव्हा चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून राजीनामा देण्याची मागणी केली जाते. यात काही चूक नाही. संबंधित व्यक्तीने राजीनामा दिलाच पाहिजे."
सुधीर मुनगंटीवार यांचे हे विधान भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात व्यक्त झालेल्या सर्वात तीव्र आणि भावनिक प्रतिक्रियांपैकी एक मानले जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कायद्यानुसार शिक्षा व्हावी हे बरोबर असले तरी, खरातसारख्या नराधमाला पाहून मनात संताप उफाळून येतो.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.