⚡ ब्रेकिंग News

पुण्याहून बीडला आले, हायव्होल्टेज टॉवरवर चढून तारा चोरतानाच टॉवर कोसळला; दोघांचा जागीच मृत्यू

अपघाताचा बनाव रचला, मृतदेह परभणीला नेले... पण शक्कल फसली; विद्युत तार चोरीच्या प्रयत्नात धक्कादायक घटना

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हायव्होल्टेज विद्युत तार चोरी करण्याच्या प्रयत्नात एका संपूर्ण टॉवरचे कोसळणे आणि त्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

पुणे येथून आलेल्या पाच जणांच्या टोळीने शनिवारी रात्री केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात हायव्होल्टेज टॉवरवर चढून तारा कापण्याचे काम सुरू केले. याच दरम्यान टॉवर अचानक जमिनीवर कोसळला. या भीषण अपघातात अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचा बनाव फसला

घटनेनंतर घाबरलेल्या इतर तीन साथीदारांनी (आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत) पोलिसांपासून वाचण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी दोन्ही मृतदेह एका कारमध्ये टाकून थेट परभणी गाठले आणि मृतदेह गाडीतच सोडून ते तिघे पसार झाले.

परभणीत गाडीच्या चालकाने रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाली. नातेवाईक आणि पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अपघाताचा बनाव फसला आणि विद्युत तार चोरीचा खरा प्रकार समोर आला.

 पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच केज आणि परभणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. टॉवर नेमका कसा कोसळला, या टोळीचे आणखी कुठे जाळे पसरले आहे का, याचा सविस्तर तपास सुरू आहे. पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेने बीड आणि परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, हायव्होल्टेज तार चोरीच्या वाढत्या प्रकाराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. अधिक तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...