⚡ ब्रेकिंग News

इराण-इस्रायल युद्धात कांदिवलीचा मुलगा बळी; ड्रोन हल्ल्यात दीक्षित सोलंकीचा दुर्दैवी मृत्यू


 इराण-इस्रायल युद्धात कांदिवलीचा मुलगा बळी; ड्रोन हल्ल्यात दीक्षित सोलंकीचा दुर्दैवी मृत्यू

तीन महिन्यांपूर्वी वारली आई, बहिणीच्या लग्नाची तयारी; मस्कतमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात संपला कुटुंबाचा आधार

मुंबई: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम मुंबईतील एका कुटुंबावर दुःखद रूपाने कोसळला आहे. कांदिवलीतील (Kandivali) एमएचबी कॉलनीत राहणाऱ्या दीक्षित अमृतलाल सोलंकी (वय ३२) या तरुणाचा ओमानमधील मस्कत (Muscat) येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पश्चिम आशियात वाढत्या तणावादरम्यान १ मार्च रोजी क्षेपणास्त्रांनी सज्ज ड्रोनने त्यांच्या जहाजावर केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.

नेमकं प्रकरण काय?

दीक्षित सोलंकी हे एमटी एमकेडी व्योम या टँकर जहाजावर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते. हे जहाज सुमारे ५९,००० मेट्रिक टन पेट्रोल घेऊन जात होते. १ मार्च रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यात जहाज गंभीररीत्या उद्ध्वस्त झाले. हल्ल्यानंतर २ मार्च रोजी काही क्रू सदस्यांना वाचवण्यात आले, मात्र दीक्षित यांना वाचवता आले नाही. मस्कतमधील भारतीय दूतावासाने (Embassy of India Muscat) या घटनेची माहिती कांदिवली पोलिसांना दिली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दीक्षित यांच्या मृत्यूची बातमी समजताच सोलंकी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी ते पुन्हा जहाजावर रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.

शेजाऱ्यांच्या अश्रू

दीक्षित यांच्या शेजारी राहणाऱ्या सुगंधा परब या वयोवृद्ध महिलेने अश्रू अनावर होत सांगितले, "दीक्षित मला माझा मुलगाच होता. तो माझा ब्लड प्रेशर चेक करायचा, शुगरच्या गोळ्या द्यायचा. घरी येताना-जाताना नक्की बोलून जायचा. तीन महिन्यांपूर्वी आई वारली तेव्हा तो घरी आला होता. आता तोच गेला."

पार्थिव मागण्यासाठी सरकारकडे विनंती

दीक्षित यांचे वडील अमृतलाल सोलंकी यांनी मुलाचे पार्थिव मुंबईत आणून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...