⚡ ब्रेकिंग News

उद्धव ठाकरेंकडून पुन्हा मोर्चेबांधणी; १ आणि २ एप्रिलला संपर्कप्रमुखांची विशेष बैठक, राज्यभराचा आढावा घेणार


 पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह सर्व विभागांचा समावेश; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगरसेवकांवर नवी जबाबदारी

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणीचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल आणि २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा संपर्कप्रमुखांच्या विशेष बैठका बोलवण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेही या बैठकींना उपस्थित राहणार आहेत.

विभागनिहाय बैठकीचे वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाडा विभागातील जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. तर २ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्रितपणे राज्यभराचा आढावा घेणार आहेत.

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगरसेवकांवर जबाबदारी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नगरसेवकांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबईतील नगरसेवकांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांसाठी खालील नगरसेवकांना जबाबदारी देण्यात आली आहे:

विदर्भ विभाग

 नागपूर - किरण तावडे

 वर्धा - सचिन पडवळ

 चंद्रपूर - निशिकांत शिंदे

 अमरावती - रमाकांत रहाटे

 अकोला - अनिल कदम

 वाशीम - हरी शास्त्री

 बुलढाणा - जोसेफ कोळी

 भंडारा - राज मुल्ला

 गोंदिया - शशिकांत झोरे

 यवतमाळ - विजय भनगे

 गडचिरोली - विठ्ठल लोकरे

मराठवाडा विभाग

 जालना - चिंतामणी निवाटे

 हिंगोली - दीपक सावंत

 बीड - विश्वास शिंदे

 नांदेड - सुनील मोरे

 छत्रपती संभाजीनगर - आशिष चेंबूरकर

 परभणी - राजू पाटील

 धाराशिव - सुनील पाटील

 लातूर - मुकेश साळुंके

उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र

 धुळे - तुळशीराम शिंदे

 नंदुरबार - जितेंद्र वळवी

 जळगाव - प्रमोद सावंत

 नाशिक - सुहास वाडकर

 पुणे - सोमनाथ सांगळे

 सातारा - सत्यवान उभे

 सांगली - स्वप्नील कुंजीर

 सोलापूर - कैलास पाठक

 कोल्हापूर - उदय दळवी

 अहिल्यानगर - सदा परब, चंगेज मुलतानी

कोकण विभाग

ठाणे - धर्मेंद्र काळे

 पालघर - सचिन पाटील

 रायगड - अंकित प्रभू

रत्नागिरी - गीतेश राऊत

 सिंधुदुर्ग - सुरेश पाटील

या बैठकीतून पक्ष संघटनेला नवी दिशा मिळणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोर्चेबांधणी महत्त्वाची मानली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाकडून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...