⚡ ब्रेकिंग News

'तिने अॅफिडेविटमध्ये लिहावं की मी सनातनी, मगच...'; केदारनाथ मंदिरात सारा अली खानला 'नो एंट्री'ची अट


  'तिने अॅफिडेविटमध्ये लिहावं की मी सनातनी, मगच...'; केदारनाथ मंदिरात सारा अली खानला 'नो एंट्री'ची अट

 बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीकडून नवीन नियम; गैर-हिंदूंना आता श्रद्धेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार; साराच्या वार्षिक यात्रेवर संक्रांत

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्या केदारनाथ धामला भेट देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) नुकत्याच जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, आता केदारनाथ मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी साराला ती 'सनातनी' असल्याचे प्रतिज्ञापत्र (अॅफिडेविट) सादर करावे लागणार आहे. 

नेमका वाद काय?

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी १७ मार्च रोजी पत्रकार परिषदेत घोषणा केली की, आता गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश देताना त्यांनी सनातन धर्मावरील श्रद्धेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.  याच पार्श्वभूमीवर सारा अली खानचा प्रश्न विचारला असता, द्विवेदी म्हणाले, "जर सारा अली खान तिची सनातन धर्मावर श्रद्धा आणि भक्ती असल्याचे जाहीर करत असेल आणि आम्हाला प्रतिज्ञापत्र देईल, तर आम्ही तिला दर्शनाची परवानगी देऊ." 

मंदिर समितीच्या १० मार्च रोजी झालेल्या बैठकीत बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर परिसर तसेच गर्भगृहात 'गैर-सनातनी'ंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव उत्तराखंड सरकारकडे पाठवण्यात आला आहे. 

सारा अली खानचे केदारनाथशी खास नातं

सारा अली खानचा २०१८ मधील पदार्पणाचा 'केदारनाथ' हा चित्रपट केदारनाथ धामलाच चित्रित झाला होता. तेव्हापासून ती दरवर्षी केदारनाथला भेट देऊन भगवान शिवाचं दर्शन घेत असते.  तिने यापूर्वी अनेक वेळा केदारनाथला भेटी दिल्या असून, २०२५ मध्ये टाइम्स नाऊ समिटमध्ये तिने तिच्या या भेटींबद्दल भाष्य केले होते. ती म्हणाली होती, "माझी केदारनाथची वैयक्तिक भेट, आवडो वा न आवडो, ती तुमच्यापैकी कोणासाठीही नाही. ती माझ्यासाठी आहे. मला तिथे शांती मिळते, आनंद मिळतो." 

कुटुंबाची पार्श्वभूमी

सारा अली खान ही अभिनेते सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे. तिचे वडील मुस्लिम आहेत, तर आई शीख आहे. तिची आजी शर्मिला टागोर यांनी मन्सूर अली खान पटौडी यांच्याशी विवाह केला होता.  साराने यापूर्वी तिच्या धार्मिक ओळखीबद्दल बोलताना सांगितले होते की, तिने आईला विचारले होते, "मी काय आहे?" तेव्हा आई म्हणाली, "तू भारतीय आहेस." 

प्रतिक्रिया आणि परिणाम

मंदिर समितीच्या या निर्णयानंतर सारा अली खानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, या निर्णयाचे समर्थन आणि विरोध दोन्ही होत आहेत. काहीजण हा निर्णय धार्मिक परंपरा जपण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हणतात, तर काहीजण याला धार्मिक स्वातंत्र्यावर गदा असल्याचे म्हणतात. 

चारधाम यात्रा १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. केदारनाथ धामचे दरवाजे २२ एप्रिल रोजी खुल्ले होणार आहेत. या यात्रेसाठी आतापर्यंत ६ लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.  आता सारा अली खान प्रतिज्ञापत्र देऊन केदारनाथला जाणार की यापुढे तिची वार्षिक यात्रा थांबणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...