जत (सांगली): जत शहरातील मार्केट यार्ड परिसरात एका २३ वर्षीय तरुणाची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
नेमकी घटना काय?
आज जत मार्केट यार्ड परिसरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, मयताची ओळख पटली आहे. मल्लेश सुरेश पुजारी (वय २३, रा. केईएम हायस्कूल समोरील झोपडपट्टी, जत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दोन संशयितांची नावे निष्पन्न
घटनेचा प्राथमिक तपास केला असता, हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोहित माने आणि शुभम पाथरूट या दोन संशयितांची नावे निष्पन्न केली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
पोलीस यंत्रणा सतर्क
घटनेची माहिती मिळताच जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.