⚡ ब्रेकिंग News

'आनंदी'च्या रूपे येतेय प्रेरणेची नवी किरण; स्टार प्रवाहवर दाखल होतेय हृदयस्पर्शी कथा

 'आनंदी'च्या रूपे येतेय प्रेरणेची नवी किरण; स्टार प्रवाहवर दाखल होतेय हृदयस्पर्शी कथा

मुंबई : सामाजिक आशय आणि भावनिक अंगाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेली स्टार प्रवाह वाहिनी आता एका वेगळ्याच आणि प्रेरणादायी कथेसह रसिकांच्या भेटीला येत आहे. वाहिनीने नुकतीच 'आनंदी' नावाच्या नव्या मालिकेची घोषणा केली असून, ही मालिका येत्या १६ मार्चपासून प्रक्षेपित होणार आहे.

या मालिकेचे शीर्षक जसे आनंद देणारे आहे, तशीच यामागची कथा देखील मनाला भिडणारी आहे. कथा आहे आनंदी नावाच्या तरुणीची, जिने एका भीषण अपघातात आपली दृष्टी गमावली. मात्र, या दुर्दैवी घटनेने तिचा जगण्याचा उत्साह कमी होऊ दिला नाही. उलट, तिने आपल्या संवेदनांना आणि मनाला आपला खरा मित्र बनवले.

डोळ्यांनी न पाहता, मनाने जाणणाऱ्या या आनंदीसाठी तिचे अंधत्व हा कधीच अडथळा ठरत नाही, तर तिची ताकद ठरते. गरजूंना मदत करणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हा तिच्या स्वभावाचा भाग आहे. 'डोळे फसू शकतात, पण मन कधीच फसत नाही' हा तिचा जीवनमंत्र तिला इतरांपेक्षा वेगळी आणि खास बनवतो.

या मालिकेतून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. नाटकक्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा तिहेरी भूमिका सांभाळणाऱ्या जाईसाठी 'आनंदी' ही भूमिका नवे आव्हान असल्याचे ती सांगते.

तिच्या या प्रवासाविषयी बोलताना जाई खांडेकर म्हणाली, "आनंदी ही केवळ एक भूमिका नसून एक भावना आहे. डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी ती मनाने अनुभवते आणि हेच तिचे वेगळेपण आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी आम्ही अंध मुलांच्या संस्थेत जाऊन जवळपास एक आठवडा कार्यशाळा घेतली. त्यांचे दैनंदिन जगणे जवळून अनुभवले. प्रेक्षकांचा या भूमिकेशी त्वरित संवाद साधेल, असा विश्वास आहे."

या उन्हाळ्यात स्टार प्रवाहवर 'आनंदी' प्रेक्षकांना नक्कीच भावनिक आणि प्रेरणादायी अशा दर्जेदार मनोरंजनाचा अनुभव देईल, यात शंका नाही.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...