क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना एक पत्र लिहिलं आहे.
या पत्रात त्यांनी अन्न व सुरक्षा भेसळ याबाबतच्या कारवाईबाबत अभिनंदन केलं. मात्र, FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लूटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केली आहे.
"हॉटेल व्यावसायिकांना धमक्या, ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा जास्त जोमाने सुरू झाला आहे," असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
यावर आज अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय, याबाबत जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती द्यावी," असे मुंढे म्हणाले.
"मी त्यांना विनंती करतो की, ती माहिती आमच्याकडे किंवा एसीबीकडे द्यावी," असे मुंढे म्हणाले.
यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, "मला याबाबत डिटेल्स मिळावेत. माझ्याकडे याबाबतची कोणतीही तक्रार आलेली नाही. कोणते अधिकारी पैसे मागतात अशी तक्रार आलेली नाही."
"मी अनेकदा विचारतो की अधिकाऱ्यांकडून त्रास होतोय का? दरम्यान, याबाबत जर त्यांच्याकडे (संजय राऊत) काही माहिती असेल तर त्यांनी द्यावी," असेही मुंढे म्हणाले.
"मी एसीबीला देखील पत्र लिहिले आहे. यामध्ये तुमच्याकडे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसंदर्भात काही माहिती असेल तर द्यावी, अशी विनंती केली आहे," असे मुंढे म्हणाले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली.
यावेळी त्यांनी बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या गुटख्यावर केलेल्या कारवाईसंदर्भात देखील माहिती दिली आहे. "महाराष्ट्रामध्ये गुटख्याचं उत्पादन होत नाही, पण बाहेरच्या राज्यातून गुटखा येत असतो," असे मुंढे म्हणाले.
"आम्ही दोन ट्रकमध्ये असणारा तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांचा गुटखा पकडला," अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "१ गाडी ट्रक आम्ही पालघरमध्ये पकडली. तर पहिल्या गाडीला पकडलेला कळतच दुसरा ट्रक नाशिक मार्गे ठाण्यात येत होता, त्यांना भिवंडीमध्ये पकडले," अशी माहिती मुंढे यांनी दिली.
"बाहेरून गुटखा दिसत नाही, पण आतमध्ये कंटेनरमध्ये हा ठेवला जातो. व्हिडिओमध्ये गुटखा कसा लपवला हे तुम्हाला दिसेल," असे मुंढे म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये साडे तीन कोटी रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
"विना परवाना खाद्यतेल विक्री केली जात होती," असे ते म्हणाले.
| मुद्दा | तपशील |
| आरोप | संजय राऊतांनी FDA अधिकाऱ्यांवर केले |
| पत्र | तुकाराम मुंढेंना लिहिलं |
| मागणी | लूटीबाबत तात्काळ कारवाई |
| मुंढेंची प्रतिक्रिया | 'माहिती असेल तर द्या; ACBला पत्र लिहिलं' |
| गुटखा जप्त | १ कोटी २६ लाख |
| ठिकाण | पालघर, भिवंडी |
| खाद्यतेल जप्त | खामगाव, बुलढाणा – साडेतीन कोटी |
| कारण | विना परवाना विक्री |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.