⚡ ब्रेकिंग News

"आमच्या नेत्यावर टीका कराल तर सोडणार नाही!" अर्जुन खोतकरांचा मनोज जरांगे पाटलांना इशारा; 'तुम्हाला बोलायला लावणाऱ्याचं नाव जाहीर करणार'


  'आम्हालाही तोंड उघडावं लागेल; मिशावर ताव देऊन चॅलेंज देऊ लागलात तर आम्हालाही मिशा आहेत'; 'शिंदे समिती कोणी स्थापन केली? SEBC आरक्षण कोणामुळे मिळाले?'; जालन्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जरांगेंविरोधात सूर

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

जालना / मुंबई - "आमच्या नेत्यावरील टीका कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केली जाणार नाही. आम्हीही समाजासाठी लढणारेच आहोत," असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांनी न्याय दिल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

"ज्याने दिलं त्याच माणसावर टीका करण्याची आता हद्द झाली आहे. मिशावर ताव देऊन चॅलेंज देऊ लागलात, तर आम्हालाही मिशा आहेत," असे खोतकर म्हणाले.

एकनाथ शिंदे सर्व समाजाला घेऊन चालणारे असल्याचे ते म्हणाले.

"शिंदे समिती कोणी स्थापन केली? SEBC आरक्षण कोणामुळे भेटले? सात लाख लोकांना कोणामुळे प्रमाणपत्र भेटले?" असा सवाल देखील खोतकरांनी केला.

"आमचा अंत पाहू नका. आमच्या नेत्यावरती अशी टीका केली तर आम्हालाही तोंड उघड करावं लागेल. आम्हीही सोडणार नाहीत," असा इशारा खोतकरांनी दिला आहे.

"जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे? जरांगेंना कोण सांगत आहे? आम्हाला माहिती आहे," असेही खोतकर म्हणाले.

"एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व समाजाने मान्य केलं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिव्या देत सुटावं आणि आम्ही सहन करू शकू. असा अर्थ नाही, आम्ही सहन करणार नाहीत," असे खोतकर म्हणाले.

"जरांगेंचं वक्तव्य हे वक्तव्य बालिशपणाचे आहे. जरांगेंना कोण बोलायला लावतो हे समाजाला माहिती आहे. पुढे ते नाव जाहीर करू," असेही खोतकर म्हणाले.

"आमचा इशारा आणि सांगणं आहे, शिंदे साहेबांवरची टीका टाळा. तुम्हाला बोलता येतं, पण आम्हाला यापेक्षा वेगळं बोलता येईल," असा इशारा खोतकरांनी जरांगे पाटलांना दिला.

जालन्यात शिवसेना पदाधिकारी संघटन बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांच्या विरोधात सूर असल्याचे पाहायला मिळाले.

एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेचा निषेध या बैठकीत करण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. विविध नेते पदाधिकारी यावर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे.

| मुद्दा | तपशील |

| इशारा | अर्जुन खोतकर यांनी जरांगेंना दिला |

| कारण | एकनाथ शिंदेंवरील टीका |

| म्हणणे | 'आमच्या नेत्यावर टीका सहन करणार नाही' |

| सवाल | 'शिंदे समिती कोणी स्थापन केली?' |

| इशारा | 'आम्हालाही तोंड उघडावं लागेल' |

| वक्तव्य | 'जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचे' |

| बैठक | जालन्यात शिवसेना संघटन बैठक |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...