क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
नाशिक - भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
अशोक खरातवर ४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार, लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिला विशेष न्यायालयाकडून १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि परदेशबंदीच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने कल्पना खरात हिच्यासह सर्व आरोपींना समन्स बजावले होते.
त्यानुसार कल्पना खरात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर २२ सप्टेंबरला हजर झाली. यावेळी कल्पना खरातकडून जामीनासाठी अर्ज करण्यात आला.
यावर कल्पना खरात हिला न्यायालयाकडून १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि परदेशबंदीच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अशोक खरातविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या ३ हजार पानी दोषारोपपत्रातील प्रकरणात सुनावणी पार पडली.
अशोक खरातला नाशिकरोड कारागृहातून व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. अशोक खरातविरुद्ध नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि राहता येथे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत.
ईडीने दाखल केलेल्या या खटल्यात न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. आता ३० सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
अशोक खरातवर दैवी शक्ती आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे.
अशोक खरातवर ४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
लोकांना लुटून कमावलेली ही काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने मोठा कट रचला होता. त्याने तब्बल १४२ बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली.
सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले.
हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे.
ईडीच्या या ३००० पानांच्या आरोपपत्रामुळे आता या भोंदूबाबाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
| मुद्दा | तपशील |
| आरोपी | अशोक खरात (भोंदूबाबा) |
| आरोप | ४७ कोटींहून अधिक गैरव्यवहार, लैंगिक अत्याचार, फसवणूक |
| गुन्हे | एकूण १७ (नाशिक, सिन्नर, शिर्डी, राहता) |
| बेनामी खाती | १४२ |
| आरोपपत्र | ३ हजार पाने (ईडी) |
| पत्नी | कल्पना खरात – १ लाख जातमुचलक्यावर सशर्त जामीन |
| न्यायाधीश | एस. व्ही. सहारे |
| पुढील सुनावणी | ३० सप्टेंबर २०२६ |
| कोठडी | न्यायालयीन कोठडी वाढली |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.