माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल गुळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश; सिद्धेश कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा; 'बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेत प्रवेश'; दिशा सालियन प्रकरणी सीबीआय चौकशीवर भाष्य; राहुल गांधींवर टीका
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात प्रवेश होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजही मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल प्रकाश गुळेकर (Nikhil Gulvekar) यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खालील व्यक्तींनीही शिवसेनेत प्रवेश केला:
शाने आलम खान
भरत चोपडे
अभिषेक चव्हाण – विधानसभा समन्वयक
आनंद कातुर्डे – उपशाखा प्रमुख
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशासनं उत्तर मुंबईत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि कामगार बांधवांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नव्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार बांधवांचे शिवसेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
"मुंबई उपनगर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. खरोखरच जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत त्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे," असे कदम म्हणाले.
"या युवा पिढीला कोणी न्याय द्यायचं काम करत असेल तर एकनाथ शिंदे साहेब करत आहे," असे कदम म्हणाले.
दिशा सालियन प्रकरणी बोलताना कदम म्हणाले की, "जी सीबीआयच्या मार्फत चौकशी होणार आहे ती पुढे येणारच आहे. जे देशाला आणि जगाला कळणारच आहे. दिशा सालियन यांच्याबाबत जे घडलं त्याला न्याय मिळाला पाहिजे."
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिमिक्री करण्यात आली. यावर बोलताना कदम म्हणाले की, "याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या देशामध्ये काय असू शकत नाही. ज्यांची इंडिया लाईन्स आहे तिथे त्याला नेता म्हणतात. अशा व्यक्ती जो पंतप्रधान मोदीजींच्या आईबद्दल, ज्या हयात नाहीत, त्यांच्यावर असा भाष्य करत असेल तर असा नेता आपल्या देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही," असे कदम म्हणाले.
| मुद्दा | तपशील |
| स्थळ | मुंबई |
| प्रवेश | शिवसेना शिंदे गटात |
| प्रमुख व्यक्ती | निखिल गुळेकर, शाने आलम खान, भरत चोपडे, अभिषेक चव्हाण, आनंद कातुर्डे |
| एकूण | शेकडो कार्यकर्ते |
| प्रमुख उपस्थिती | सिद्धेश कदम |
| प्रभाव | उत्तर मुंबईत शिवसेनेची ताकद वाढणार |
| विषय | दिशा सालियन प्रकरण, राहुल गांधींवर टीका |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.