⚡ ब्रेकिंग News

मोठी बातमी! छत्तीसगडमधील 'झीरम घाटी' नक्षलवादी हल्ला प्रकरणात 10 दोषींना फाशीची शिक्षा; काँग्रेस नेत्यांसह 29 जणांचा झाला होता मृत्यू

2013 मधील भीषण हल्ल्यातील 10 नक्षलवाद्यांना मृत्युदंड; जगदलपूर येथील विशेष NIA न्यायालयाचा निर्णय; उच्च न्यायालयाच्या पुष्टीनंतर अंमलबजावणी; 28 आरोपी अद्याप फरार

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

जगदलपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील नक्षलवाद संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh Naxal Attack) 25 मे 2013 च्या 'झीरम घाटी' (Jhiram Ghati) नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूर (छत्तीसगड) येथील एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

काल म्हणजेच 16 सप्टेंबर 2026 रोजी या प्रकरणी सुनावणी होऊन 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 5 सप्टेंबर रोजी जगदलपूर येथील विशेष 'एनआयए' न्यायालयाने 2013 च्या या अत्यंत भयावह आणि गाजलेल्या नक्षलवादी हल्ल्यात 10 नक्षलवाद्यांना दोषी ठरवले होते. मात्र तेव्हा शिक्षा सुनावली नव्हती. अशातच काल सर्व दोषींना मृत्युदंड सुनावले गेले आहे.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील 'दरभा' पोलीस स्टेशन अंतर्गत 'झीरम घाटी'त 25 मे 2013 रोजी काँग्रेसच्या 'परिवर्तन यात्रे' वर नक्षलवाद्यांनी घेरून हल्ला केला होता.

हल्ल्याच्या वेळेला तिथे 200 पेक्षा जास्त नक्षलवादी उपस्थित होते, असे नंतरच्या तपासात समोर आले होते. नियोजनबद्ध पद्धतीने काँग्रेस नेत्यांच्या ताफ्याला चारही बाजूने घेरून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. तर ताफा थांबवण्यासाठी पहिल्या वाहनाच्या जवळ भूसुरुंग स्फोट करण्यात आला होता.

त्या हल्ल्यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसह सुरक्षा दलाचे अनेक जवान अशा 29 जणांचा मृत्यू झाले होते. 30 पेक्षा जास्त लोक जखमी ही झाले होते. त्या दिवशीचा हल्ला भारतात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांमधील सर्वाधिक भीषण हल्ल्यांपैकी एक मानला जातो.

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आणि शिक्षा सुनावण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

| अ.क्र. | नाव |

| 1 | प्रमिला मोडियाम |

| 2 | चैतू लेकाम ऊर्फ मुन्ना |

| 3 | सुमिता ऊर्फ पुनेम मोडियाम |

| 4 | मुक्का मंडावी |

| 5 | कोसा कवासी ऊर्फ कोसराम |

| 6 | आयता मरकाम |

| 7 | मडकामी देवा |

| 8 | जोगा मडकामी |

| 9 | बंजामी सन्ना ऊर्फ चम्रू |

| 10 | महादेव नाग |

दोषींना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक आहे.

झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी 25 सप्टेंबर 2014 रोजी 11 अटक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर आरोपपत्रात नाव असलेले 28 आरोपी अद्यापही फरार असून त्यापैकी काही मोठ्या नक्षली कमांडरने गेल्या काही महिन्यात सुरक्षा दलांसमोर सरेंडरही झाले आहे.

या भयावह हल्ल्यात छत्तीसगडच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. मारले गेलेल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

जे छत्तीसगड काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष होते. पक्ष संघटनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलवा जुडूम मोहिमेच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावणारे नेते होते. नक्षलवाद्यांसोबत लढण्यासाठी सलवा जुडूम मोहिमेत त्यांचा सहभाग होता.

माजी केंद्रीय मंत्री आणि छत्तीसगडमधील वरिष्ठ काँग्रेस नेते होते. विद्याचरण शुक्ल या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला.

छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मुलगा होता. वडिलांसोबत तोही या हल्ल्यात मारला गेला.

या हल्ल्यात 29 जण मारले गेले होते. ज्यामध्ये काँग्रेस नेते आणि सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश होता.

या हल्ल्यातून बचावलेल्या एका व्यक्तीची चर्चा आजही होते. कवासी लखमा हे झीरम घाटी हल्ल्याच्या वेळी काँग्रेसचे कोंटा मतदारसंघाचे आमदार होते.

ते 1998 पासून कोंटा मतदारसंघाचे आमदार होते.

25 मे 2013 रोजी हल्ल्याच्या वेळी ते काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या ताफ्यातच होते.

नक्षलवाद्यांनी ताफ्यावर हल्ला केल्यानंतर कवासी लखमा आश्चर्यकारकरीत्या बचावले होते. असे म्हटले जाते की ते ज्या वाहनात होते त्या वाहनातील इतर काही जण मारले गेल्यानंतर ही लखमा यांचा जीव वाचला होते.

त्यामुळे हल्ल्यानंतर अनेकांनी कवासी लखमा यांच्या भूमिकेवरही संशय घेतला होता. या संशयावरून अनेक चर्चा झाल्या, मात्र लखमा यांनी सातत्याने हे आरोप फेटाळले आहेत.

| मुद्दा | तपशील |

| घटना | झीरम घाटी नक्षलवादी हल्ला |

| दिनांक | 25 मे 2013 |

| स्थळ | सुकमा जिल्हा, छत्तीसगड |

| एकूण मृत्यू | 29 |

| न्यायालय | जगदलपूर येथील विशेष NIA न्यायालय |

| शिक्षा | 10 दोषींना फाशी |

| तपास यंत्रणा | NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) |

| फरार आरोपी | 28 |

| अपील मुदत | 30 दिवस |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...