⚡ ब्रेकिंग News

प्रभू श्रीराम आणि राममंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून धंदा सुरू केला? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

'ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय'; 'ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन देवेंद्र'; नीट-टीईटी पेपरफुटीवरही जोरदार टीका

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

हिंगोली :  शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या हिंगोली मतदारसंघात आयोजित सभेत जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी राममंदिरातील दानपेटी लुटी प्रकरणावरून भाजपवर सडकून टीका केली. "प्रभू श्रीराम आणि राममंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे, पण भाजपने तिथे दुकान उघडून रामाच्या नावाने धंदा सुरू केला का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला . राममंदिराच्या दानपेटीतून चोरी होणे ही हिंदूंशी केलेली गद्दारी असल्याचे ते म्हणाले.

 'राममंदिरात लूट, ही हिंदुत्वाशी गद्दारी'

उद्धव ठाकरे म्हणाले, "राममंदिराच्या दानपेटीतून चोरी चालल्याचे जे मामले उघडकीस येत आहेत, ही केवळ आर्थिक चोरी नसून ही हिंदूंशी केलेली गद्दारी, हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे." त्यांनी भाजपवर आरोप केला की, त्यांनी श्रद्धेच्या ठिकाणी व्यापार सुरू केला आहे. 

 'ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'विमानापेक्षा ईमान महत्त्वाचे' या विधानावर पलटवार करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय. जो माणूस शिवसेनेशी ईमान राखू शकत नाही, तो देवेंद्र फडणवीसांशीही राखणार नाही." त्यांनी शिंदे यांना 'बेईमान' ठरवत, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 'ऑपरेशन टायगर' नव्हे 'ऑपरेशन देवेंद्र'

शिवसेना फोडण्यामागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी असू शकते, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "हे 'ऑपरेशन टायगर' नसून ऑपरेशन देवेंद्र' असू शकते. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर त्यांच्या पंतप्रधान पदाची संधी निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच गुंतवून ठेवण्यासाठी किंवा संपवून टाकण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी ही खेळी केली असू शकते."

 पेपरफुटीवर जोरदार टीका

नीट आणि टीईटी सारख्या परीक्षांचे पेपर फुटणे ही राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आरोप केला की, "हे पेपर फोडणारे एका विशिष्ट परिवाराशी संबंधित असल्याने ते विनासायास बाहेर पडतील आणि पुन्हा पेपर फोडायला मोकळे होतील."

 'गद्दारीची किड चिरडली नाही तर महाराष्ट्र वाचणार नाही'

उद्धव ठाकरे यांनी परभणी आणि हिंगोलीमधून निवडून दिलेले खासदार गद्दारी करत असले, तरी इथले शिवसैनिक आणि मतदार कायम शिवसेनेसोबत राहिले आहेत, असे सांगितले. त्यांनी इशारा दिला, "गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरते त्या किडेला वेळेत जर का आपण चिरडलं नाही तर मग महाराष्ट्र वाचणार नाही, देश वाचणार नाही."

'कर्जमाफी' विरुद्ध 'कर्जमुक्ती'

सध्याच्या सरकारच्या 'कर्जमाफी' आणि आपल्या सरकारच्या 'कर्जमुक्ती'मधील फरक त्यांनी स्पष्ट केला. ते म्हणाले, "माफी ही गुन्हेगाराला दिली जाते, शेतकऱ्याला नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, या भावनेतून मी केलेली ती कर्जमुक्ती होती." त्यांनी कोणत्याही अटी-शर्तींविना दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केल्याची आठवण करून दिली.

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेत राममंदिरातील दानपेटी लुटी, पेपरफुटी, गद्दार खासदार आणि महायुतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यांनी 'ऑपरेशन टायगर'ला 'ऑपरेशन देवेंद्र' म्हणत भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा मुद्दा उपस्थित केला. शिंदेंच्या 'ईमान'च्या विधानाला उत्तर देत त्यांना 'बेईमान' ठरवले. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा उपस्थित करत महायुतीच्या धोरणांवर प्रहार केला. आता या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...