⚡ ब्रेकिंग News

आटपाडीत संघर्षाऐवजी समन्वयाची 'वाढती पावले'; अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनानंतरच टप्प्याटप्प्याने कारवाई!

 



 आटपाडीत संघर्षाऐवजी समन्वयाची 'वाढती पावले'; अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनानंतरच टप्प्याटप्प्याने कारवाई!

​नगराध्यक्ष उत्तम जाधव यांची ग्वाही; नियोजित मोहीम तूर्त स्थगित, प्रशासकीय बैठकीत सुवर्णमध्यावर शिक्कामोर्तब.

क्रांती न्यूज प्रतिनिधी: किरण देशमुख 

आटपाडी :

शहराचा विकास करताना कुणाचीही चूल विझणार नाही, उलट सर्वांना सोबत घेऊन आटपाडीला सुंदर आणि शिस्तबद्ध बनवू, असा नवा आदर्श आटपाडी नगरपंचायतीने घालून दिला आहे. बाजार पटांगण ते ब्राह्मण घाट आणि सांगोला चौक या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर प्रशासकीय भवनात नगरपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अतिक्रमण धारक यांच्यात एक अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत "आधी पुनर्वसन, मगच टप्प्याटप्प्याने अतिक्रमण मुक्ती" असा महत्त्वपूर्ण निर्णय घेत नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी उद्याची कारवाई तूर्त स्थगित करत असल्याची घोषणा केली.

बैठकीत मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला, तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्या उदरनिर्वाहाची चिंता व्यक्त केली. श्रीकांत देशमुख, धनाजी पाठक आणि कल्याण काळे या अतिक्रमण धारकांनी भाविक साद घालत, 'आमच्या जगण्याची आधी सोय करा' अशी मागणी केली. या संवेदनशील परिस्थितीवर तोडगा काढत, "माझ्या प्रभागात सर्वाधिक अतिक्रमणे असली तरी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही," असा शब्द नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी दिला. कल्याण काळे यांनी सुचवलेल्या आटपाडी ओढा पात्राजवळील मोकळ्या जागेत पुनर्वसन करण्याच्या पर्यायावरही सकारात्मक चर्चा झाली.

राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी शहराचा सुनियोजित 'डीपीआर' तयार करण्याची सूचना केली. केवळ कारवाई करणे हा हेतू नसून आटपाडीला अधिक सुरक्षित आणि सुंदर करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. लोकशाही मार्गाने आणि सामोपचाराने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील भयभित वातावरण दूर झाले असून, प्रशासन आणि जनता एकत्र आल्यास शहराचा विकास किती सुंदर होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या बैठकीने दाखवून दिले आहे.

​या बैठकीला बांधकाम सभापती बाळासाहेब हजारे, नगरसेवक महेश देशमुख, शिवसेनेचे गटनेते अमरसिंह देशमुख, धनाजी चव्हाण, सुभाष सातारकर, भाजप नेते चंद्रकांत दौंड, जगन्नाथ लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...