⚡ ब्रेकिंग News

लेंगरे ता. खानापूर येथे ३० मे रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा भव्य मेळावा

 


लेंगरे ता. खानापूर येथे ३० मे रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा भव्य मेळावा

नितीन बानुगडे पाटील यांचे मार्गदर्शन; 'गाव तेथे शाखा, 

घर तेथे शिवसैनिक' अभियानाचा शुभारंभ


क्रांती न्यूज - प्रतिनिधी 

लेंगरे (ता. खानापूर, जि. सांगली): 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लेंगरे येथे शनिवार, ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मारुती मंदिराजवळ भव्य पक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 'गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक' या विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून, जेष्ठ शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा भव्य सत्कारही होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. व्यासपीठावर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी संजय काटे (सांगली जिल्हा प्रमुख), अभिजीत पाटील (जिल्हा प्रमुख व जि.प. सदस्य), तानाजी सातपूते (मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख), स्वप्नील कुंजीर पाटील (जिल्हा निरीक्षक), शंभुराज काटकर, विशालशिंग राजपूत, मयूर घोडके (सांगली शहर प्रमुख) आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, निवृत्त सैनिक, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, महिला बचत गट, उच्च पदवीधर, चित्रपट कलाकार, पारंपरिक वादक, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ शिवसैनिक तसेच सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा व औद्योगिक क्षेत्रातील गुणवंतांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

हा मेळावा शिवसेना खानापूर तालुका प्रमुख प्रविण चंदनशिवे, महिला आघाडी तालुका प्रमुख भावना जंगम यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व लेंगरे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील व परिसरातील सर्व शिवसैनिक, नागरिक तसेच माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...