⚡ ब्रेकिंग News

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात 'ठिणगी': जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंवर बोचरा वार


सातारा जिल्ह्याच्या राजकारणात 'ठिणगी': जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंवर बोचरा वार

सातारा: - क्रांती न्यूज प्रतिनिधी 

जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. "आम्ही काय पाच वर्षे फक्त बघायलाच बसलोय का?" अशा आक्रमक भाषेत गोरेंनी देसाईंना ठणकावून सांगितले.

 जयकुमार गोरेंचा हल्लाबोल:

पालकमंत्र्यांची 'ब्लेम गेम'ची रणनीती आता चालणार नाही.

 शिवेंद्रराजेंचे स्पष्टीकरण: आम्ही 'युती धर्म' पाळला; ज्यांनी मदत केली त्यांनाच साथ दिली.

 सीसीटीव्ही वाद:

 आरोपांची चौकशी होणार; सर्व निवडी नियमानुसारच.

"धमकावण्याची रणनीती आता चालणार नाही" – जयकुमार गोरे

सभापती निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जयकुमार गोरे अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "दोन सदस्यांना कायदेशीररीत्या अटक झाली तरी त्याचे खापर आमच्यावर फोडायचे आणि आम्हालाच दम द्यायचा, ही पालकमंत्र्यांची जुनीच पद्धत आहे. जर ते पाच वर्षांची भाषा करत असतील, तर आम्हीही पाच वर्षे बघायलाच बसलो आहोत." निवडी पारदर्शक झाल्या असून 'लोकशाहीचा खून' झाल्याचा कांगावा करणे थांबवावे, असेही त्यांनी सुनावले.

"आम्ही मिठी मारायला तयार होतो, पण..." – शिवेंद्रसिंहराजे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 'युती धर्मा'वरून देसाईंना घेरले. ते म्हणाले, "आमच्याकडे बहुमत होते म्हणून आम्ही निवडी केल्या. विरोधकांनी अर्जच भरले नाहीत आणि आता आरोप करत आहेत, हा 'रडीचा डाव' आहे. आम्हाला ज्यांनी मदत केली, त्यांना आम्ही साथ दिली. आम्ही तर त्यांना जवळ घ्यायला, मिठी मारायला तयार होतो, पण तेच लांब पळत होते. शिपायामार्फत निरोप धाडणाऱ्या नेत्यांनी आम्हाला युती धर्म शिकवू नये."

जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी झालेल्या गोंधळावर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आरोपांवरून साताऱ्यात दोन गट पडले आहेत. एकीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, दुसरीकडे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजेंनी ही कारवाई कायदेशीर असल्याचे सांगत पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

"निवडी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने आणि नियमानुसारच झाल्या आहेत. सीसीटीव्हीबाबतच्या आरोपांची चौकशी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करतील."

— मंत्री जयकुमार गोरे


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...