⚡ ब्रेकिंग News

अजित पवार विमान अपघात प्रकरण: रोहित पवार यांची मोठी मागणी, 'इंडीया आघाडीने मुद्दा लावून धरावा; राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी'

  अजित पवार विमान अपघात प्रकरण: रोहित पवार यांची मोठी मागणी, 'इंडीया आघाडीने मुद्दा लावून धरावा; राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी'

'हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय', रोहित पवार यांची सीआयडी कार्यालयात तक्रार; सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अमित शाह यांना भेटणार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणी 'इंडीया' आघाडीने हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करावा, अशी मागणी केली असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांची समिती स्थापन करून तिचे अध्यक्षपद खासदार राहुल गांधी यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर हा अपघात नसून घातपात असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन दिले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, "अजित पवार यांच्या विमान अपघाताची गंभीर चौकशी व्हायला हवी. यासाठी इंडीया आघाडीने हा मुद्दा लावून धरायला हवा. या प्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांची समिती स्थापन करून तिचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी असावे. याबाबत राहुल गांधी यांच्या जवळच्या लोकांशी चर्चा करण्यात आली आहे," असे त्यांनी सांगितले.

अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करताना रोहित पवार यांनी आरोप केला की, "अपघातानंतर ही विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर नेण्यात येत आहेत. हैदराबादला असलेले 'लेगसी 600' हे विमान आता सॅन मारिनो (यूएसए) येथे हलविण्यात आले आहे. धंदाही तिकडे स्थलांतरित केला जात आहे. कागदपत्रेही रंगवली जात आहेत. 'चोर नसाल तर घाबरायचं कारण नाही, पण चोरच घाबरू शकतो', हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे," असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. रोहित पवार म्हणाले, "या प्रकरणाची मोठ्या स्तरावर चौकशी व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील. कालच पार्थ खासदार झाल्याने त्याच्यावर काही बंधने असतील; पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अमित शाह यांना भेटून ही मागणी करतील." अपघाताबाबत सर्वांचे एकमत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...