⚡ ब्रेकिंग News

आमच्या जमिनीत काय करताय?’ विचारलं अन् थेट कोयत्याने घाव घातला


 जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; सिंधुदुर्गातील सावंतवाडी हादरली, पिता-पुत्राला अटक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतकेचे नाव सरस्वती सावंत असे आहे.

शनिवारी सकाळी सरस्वती सावंत या आपल्या मुलासोबत (एकनाथ सावंत) घराशेजारील शेतात काम करत होत्या. यावेळी शेजारी राहणारे विजय कृष्णा सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत हे दोघे तिथे आले. त्यांनी “तुम्ही आमच्या जमिनीत काय करताय?” असा सवाल करत वादाला सुरुवात केली.

शाब्दिक बाचाबाची काही क्षणातच हाणामारीत रूपांतरित झाली. संतापलेल्या पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर भीषण वार केला. हल्ला इतका तीव्र होता की, महिलेच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्या जागीच कोसळल्या.

आपल्या डोळ्यादेखत आईवर झालेला जीवघेणा हल्ला पाहून मुलगा एकनाथ हादरला. त्याने तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली आणि सरस्वती सावंत यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी घटनेच्या तातडीने तपास सुरू करत आरोपी विजय कृष्णा सावंत आणि रघुनाथ विजय सावंत या पिता-पुत्राला लवकरच ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे ओवळीये गावात प्रचंड खळबळ उडाली असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका जमिनीच्या तुकड्यासाठी शेजाऱ्यांनी वृद्ध महिलेचा जीव घेतल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...