⚡ ब्रेकिंग News

सातारा जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीची बरोबरी! ११ पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? पाहा संपूर्ण यादी


  सातारा जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीची बरोबरी! ११ पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? पाहा संपूर्ण यादी

 भाजपच्या ५, राष्ट्रवादीच्या ५, शिवसेनेच्या १; कराडमध्ये प्रथमच भाजपची सत्ता, मंत्री गोरे यांच्या माणमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा

सातारा: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातारा जिल्ह्यातील एकूण ११ पंचायत समित्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी ५ जागांवर सत्ता मिळवत बरोबरी साधली आहे. तर शिवसेनेने एका पंचायत समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकाही ठिकाणी यश मिळालेले नाही.

कोणत्या पंचायत समितीत कोणाची सत्ता?

भाजपचा झेंडा (५ ठिकाणी)

1. सातारा: सभापती - महेश गाडे, उपसभापती - सुषमा जाधव

2. फलटण: सभापती - शिवांजली भोसले (भाजप), उपसभापती - गणेश सस्ते (शिवसेना)

3. जावळी: सभापती - सौरभ शिंदे, उपसभापती - गोरख महाडीक

4. कराड: सभापती - नंदा यादव, उपसभापती - अनिता यादव (प्रथमच भाजपची सत्ता)

5. खटाव: सभापती - वनीता दुबळे, उपसभापती - रेश्मा शेडगे

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा (५ ठिकाणी)

1. महाबळेश्वर: सभापती - शकुंतला चोरमले, उपसभापती - संजय मोरे (शिवसेना)

2. कोरेगाव: सभापती - रूपाली गुरव, उपसभापती - रवींद्र पवार

3. माण: सभापती - विक्रम शिंगाडे, उपसभापती - प्रियंका जगदाळे

4. वाई: सभापती - विक्रांत डोंगरे, उपसभापती - वर्षा जगताप

5. खंडाळा: सभापती - छायाताई जाधव, उपसभापती - संतोष वीर

शिवसेनेचा झेंडा (१ ठिकाणी)

1. पाटण: सभापती - सविता पवार, उपसभापती - विजय पवार (शंभूराज देसाई गट)

मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत दोन बड्या मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सातारा आणि जावळी पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती आणि उपसभापती दोन्ही पदे मिळवत धक्का दिला आहे.

फलटणमधील अनपेक्षित निकालाने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, या निवडणुकीने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. आता जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...