⚡ ब्रेकिंग News

शालार्थ आयडी घोटाळ्यात अशोक खरातचा हात? दीपक केसरकरांच्या कारकिर्दीत भावाला मिळाला आयडी, शिक्षण विभागाची मात्र चुप्पी


आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलीप खरातची चौकशी होण्याची शक्यता; राजकीय हस्तक्षेपाचीही चर्चा

नाशिक : राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात याला मिळालेला शालार्थ आयडी खरा की खोटा, याचा तपास आता नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. या प्रकरणात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कारकिर्दीत हा आयडी मंजूर झाल्याची चर्चा असून शिक्षण विभागाने मात्र याबाबत मौन बाळगले आहे.

दिलीप खरातला मिळाला शालार्थ आयडी

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, २०२२ साली तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची चर्चा आहे. दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याला मिळालेला शालार्थ आयडी खरा की खोटा, याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता

नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिलीप खरात याची चौकशी होऊ शकते, तसेच या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच अशोक खरातशी संबंधित काही व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.

राजकीय हस्तक्षेपाची चर्चा

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा असून शिक्षण विभागातील काही फाईल्स अशोक खरातच्या दबावाखाली मंजूर केल्याची चर्चा रंगली आहे. अशोक खरात आणि दीपक केसरकर यांच्यातील संबंधांमुळेच त्याला शालार्थ आयडी मिळाल्याची चर्चा शिक्षण विभागात जोर धरत आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेले नाही.

रुपाली चाकणकर प्रकरणही गाजतंय

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अशोक खरात आधीच चर्चेत आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नावही समोर आले होते. त्यामुळे त्यांना आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींसह त्यांनाही एसआयटीकडून समन्स बजावण्यात आले असून चौकशी होणार आहे.

निलेश चाकणकरांवरही आरोप

दरम्यान, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात निलेश चाकणकरांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात अशोक खरातचा सहभाग उघडकीस आल्यास हे प्रकरण आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत या संदर्भात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...