⚡ ब्रेकिंग News

ओबीसी आरक्षण संपलं, झोपा काढा; विखे पाटलांच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंचा संताप


ओबीसी आरक्षण संपलं, झोपा काढा; विखे पाटलांच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंचा संताप

'सत्ताधाऱ्यांनी केलं महापाप', म्हणत हाकेंनी दिला आंदोलनाचा इशारा; मराठा आरक्षणावरून राज्यात नवा संघर्ष

मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने कुणबी नोंदींसंदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीवरून राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिलेल्या माहितीनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सत्ताधारी भाजपा-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ओबीसींचे आरक्षण संपले असून शासन त्याला खतपाणी घालत आहे,' अशी खोचक टीका हाके यांनी केली.

विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे समितीच्या स्थापनेपासून राज्यभरात 48 लाख कुणबी नोंदी आढळून आल्या असून गेल्या सहा महिन्यांत 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. यामध्ये संभाजीनगरमध्ये 49 हजार तर बीड जिल्ह्यात 34 हजार प्रमाणपत्रांचा समावेश आहे. या हालचाली ओबीसी आरक्षण संपवण्यासाठीच असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.

लक्ष्मण हाकेंनी नेमके काय म्हटले?

 लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, "महाराष्ट्रातल्या ओबीसींनो, तुमचं आरक्षण संपलं आहे. तुम्ही झोपा काढा. राधाकृष्ण विखे पाटील सारख्या मंत्र्याने ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठीच पुढाकार घेतला आहे. एका बाजूला 'ओबीसी आमचा डीएनए आहे' असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला शांत डोक्याने आरक्षण संपवण्याचं महापाप सत्ताधाऱ्यांनी केलं आहे."

पुढे बोलताना ते म्हणाले, "48 लाख कुणबी नोंदी आणि बारा लाख प्रमाणपत्रं वाटल्याचं जाहीर केलं जातंय. पुन्हा शिंदे समितीला मुदतवाढ दिली जातेय. गेली दोन वर्ष आम्हाला बदनाम केलं जातंय, शिव्या दिल्या जातात, आमच्यावर हल्ले होतात. कोर्टात जाऊन चालणार नाही, आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील ओबीसींनी जागं व्हावं, नाहीतर तुमचं आरक्षण कोणीही परत देणार नाही."

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...