⚡ ब्रेकिंग News

इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट

इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट

इस्त्रायलचा साऊथ पार्सवर हल्ला, इराणचं कतारच्या रास लफानवर प्रत्युत्तर; तेलाच्या किमती २०० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता

आखाती देशात पेटलेल्या युद्धामुळे जगावर ऊर्जासंकट ओढावल्याचं चित्र आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेली इराण-इस्त्रायल लढाई केवळ क्षेपणास्त्रं आणि ड्रोनपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट ऊर्जा स्त्रोतांपर्यंत पोहोचली आहे. पुढील १३ वर्षे संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल, एवढा गॅस ज्या केंद्रांवर उपलब्ध आहे तेच दोन केंद्रं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

साऊथ पार्सवर इस्रायलचा हल्ला

इराणच्या दक्षिण भागात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स भागात इस्रायलने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे युद्धाने आणखी गंभीर वळण घेतल्याचं दिसत आहे.

रास लफानवर इराणचं प्रत्युत्तर

इस्रायलच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणने कतारच्या रास लफान भागात प्रतिहल्ले केले. रास लफान भागात यामुळे मोठी आग लागली, मात्र तात्काळ ही आग नियंत्रणात आणण्यात आली. कतारचा हा भाग नॉर्थ डोम म्हणूनही प्रसिद्ध आहे. गॅस पुरवठ्यासाठी हे दोन्ही प्रदेश अत्यंत महत्त्वाचे असल्याने, एकमेकांच्या ऊर्जा क्षेत्रातील माऱ्यांमुळे युद्ध अधिक धोकादायक वळणावर येऊन ठेपल्याचं दिसतंय.

रास लफानची वैशिष्ट्ये काय?

   जगातील सर्वात मोठं एलएनजी हब

   जगभरातील देशांना एलएनजी आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्यात

   कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा

   रास लफानमध्ये अडथळा आला तर जागतिक गॅस पुरवठ्यावर परिणाम

   अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याचा धोका

भारताचं टेन्शन वाढलं

भारत तेल आणि गॅसच्या आयातीबाबतीत मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे. एलएनजीच्या एकूण गरजेपैकी भारत ३८ ते ४० टक्के गॅस कतारमधून आयात करतो. कतारच्या रास लफान भागातून प्रामुख्याने या गॅसचा पुरवठा होतो. त्यामुळे कतारमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारताचं टेन्शनही वाढल्याचं दिसत आहे.

तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता

या युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर्स प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. युद्ध सुरू होऊन तीन आठवडे झाले असले तरी, हे युद्ध लवकर संपण्याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...