हार्दिक पांड्याच्या मुलाची मायेने काळजी घेताना दिसली महिका; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर एक भावनिक आणि कौतुकास्पद व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा हार्दिकचा मुलगा अगस्त्य पांड्या याची आईसारखी काळजी घेताना दिसली.
सामना संपल्यानंतर वानखेडे स्टेडियममधून बाहेर पडताना महिका अगस्त्यला घेऊन गर्दीतून जात होती. पॅपाराझींचे कॅमेरे तिच्यावर आणि अगस्त्यवर खिळले असताना महिकाने लगेचच पॅपाराझींना फोटो न काढण्याची विनंती केली. मात्र पॅपाराझी थांबले नाहीत, तेव्हा महिकाने अगस्त्यचे डोळे आपल्या हातांनी झाकले आणि गर्दीतून वाट काढत त्याला सुरक्षितपणे गाडीपर्यंत नेले.
या व्हीडिओत महिकाची अगस्त्यबद्दलची माया आणि प्रोटेक्टिव्ह वृत्ती स्पष्टपणे दिसते. नेटिझन्सनी या व्हीडिओला भरभरून प्रतिसाद देत महिकाचे खूप कौतुक केले आहे. अनेकांनी तिला “अगस्त्यची दुसरी आई” असेही संबोधले आहे.
हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा यांचे नाते २०२५ पासून अधिकृतपणे समोर आले आहे. त्यानंतर दोघे विविध प्रसंगी एकत्र दिसत आहेत. हार्दिक अगस्त्यला जेवढा प्रोटेक्टिव्ह आहे, तेवढीच महिकाही अगस्त्यबद्दल मनापासून काळजी घेत असल्याचे या व्हीडिओतून दिसून येते.
हार्दिककडून महिकाला महागडे गिफ्ट
नुकतेच हार्दिक पांड्याने महिका शर्माला मर्सिडीज-बेंझ V-क्लास लक्झरी कार भेट दिली आहे. या गाडीची किंमत सुमारे १.७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या गाडीशेजारी उभे राहून महिका आणि हार्दिकचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हार्दिकने अगस्त्यला देखील एक लक्झरी कार भेट दिली होती आणि स्वतःसाठी फेरारी खरेदी केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.